Take a fresh look at your lifestyle.

Bigg Boss मराठीचा होस्ट बदलणार; मांजरेकरांची जागा ‘हा’ अभिनेता घेणार..?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो बिग बॉस मराठीचा चौथा सिझन येतोय. एकीकडे प्रतीक्षा तर दुसरीकडे उत्कंठता. त्यात आता बिग बॉस मराठीविषयी एक अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. आतापर्यंत बिग बॉस मराठीच्या होस्टिंगची धुरा अभिनेता महेश मांजरेकर सांभाळत होते. पण आता चौथा सिजन मात्र ते होस्ट करणार नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या सिजनचा होस्ट असणार कोण..? असा प्रश्न पडला होता. अशातच एक नाव समोर आलंय आणि हे नाव आहे प्रेक्षकांचा लाडका सिद्धार्थ जाधव.

मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉस मराठी शोचे होस्ट अभिनेता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट फक्त तीन सिझनपर्यंत होत असं सांगितलं. त्यामुळे आता चौथा सिजन काही ते होस्ट करणार नाहीत असं स्पष्ट म्हणाले. यानंतर आता नवीन माहितीनुसार, मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव हा बिग बॉस मराठी सिजन ४ या कार्यक्रमाचे होस्टिंग करणार आहे असं बोललं जात आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव हा विविध चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे. त्यामुळे त्याची हि स्पेशल इनिंग सगळ्यांसाठीच खास असणार आहे.

बिग बॉस मराठी सिजन ३ च्या फिनालेसाठी काही क्षण अभिनेता सिद्धार्थ जाधव या शोचे सूत्रसंचालन करताना दिसला होता. यानंतर कदाचित बिग बॉस मराठी ४च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सिद्धार्थच्या खांद्यावर देण्याचे योजिले आहे. पण तरीही अद्याप वाहिनी, शोचे निर्माते आणि सिद्धार्थकडून याविषयी कोणतीही आलेली नाही. ‘बिग बॉस मराठी’चे तीनही पर्व चांगलेच गाजले. यानंतर लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात कोण सहभागी होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.