Take a fresh look at your lifestyle.

बिग बॉस मराठीतील लेडी बॉस एव्हिक्ट; शेवटच्या टप्प्यावर मीरा जगन्नाथ स्पर्धेबाहेर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरु झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून जिने बिग बॉसचं अख्ख घर आणि स्पर्धकांना हादरवून सोडलं ती स्पर्धक म्हणजे धाकड गर्ल मीरा जगन्नाथ. असा एकही मुद्दा नाही जिथे मीराचा समावेश नाही. असं एकही भांडण नाही ज्यात मीराचा आवाज नाही. असा एकही स्पर्धक नाही ज्यांच्यासोबत मीराचा राडा नाही. अखेर…. हा आवाज, हा दंगा आणि राडा गर्लने बिग बॉस मराठीच्या टॉप ६ मध्ये आपली जागा कायम केली. यानंतर मिड वीक एलिमिनेशनमध्ये मात्र मीराचा हा जबरा प्रवास संपला आणि तिने बिग बॉसचा निरोप घेतला.

‘बिग बॉस मराठी ३’चा ग्रँड फिनाले अगदीदोन दिवसांवर येऊन ठेपला असताना घरातून मिड एलिमिनेशन झालं आणि मीराचा प्रवास संपला. हे एलिमिनेशन सर्वांसाठी शॉकिंग एलिमिनेशन होतं. कारण पहिल्या दिवसापासून सर्वानाच घरात मीराचा आवाज, मीराची किरकिर आणि मीराच्या राड्यांची सवय झाली होती. अखेर मीरा जगन्नाथ शोमधून बाद झाली. आता मीरा घराबाहेर पडल्याने ‘बिग बॉस मराठी ३’ला त्याचे टॉप ५ स्पर्धक मिळाले आहेत. यात विशाल निकम, मीनल शाह, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे या पाच स्पर्धकांचा समावेश आहे.

दरम्यान गेल्या आठवड्यात स्पर्धक विशाल निकमने घाम गाळून शक्ती युक्ती सर्व पणाला लावून ‘तिकिट टू फिनाले’ टास्क जिंकला आणि थेट ग्रँड फिनाले जिंकत कधीच ग्रँड फिनालेमध्ये आपली जागा पक्की केली. यानंतर मीरा जगन्नाथ, विकास पाटील, जय दुधाणे, मीनल शाह आणि उत्कर्ष शिंदे या पाच स्पर्धकांमध्ये लढत जुंपली होती. यानंतर महेश मांजरेकरांनी चावडीच्या दिवशी सोनाली पाटीलच्या एव्हिक्शननंतर मिड- वीक एलिमिनेशन होणार हे सांगितले होते. यानंतर वोटींगच्या आधारे घरातून मीरा जगन्नाथाचा पत्ता कट झाला आणि आता एकच लक्ष एकच ध्यास.. ‘बिग बॉस मराठीचा विनर कोण होणार?