Take a fresh look at your lifestyle.

बिग बॉस मराठीच्या घरात होणार पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री; कोण आहे हा नवा सदस्य?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या घरात १५ वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकित लोक एकत्र आले आणि या तिसऱ्या पर्वाला एकदम धडाक्यात सुरुवात झाली. बघता बघता या रिऍलिटी शो ने अगदी काहीच दिवसात इतके नाव कमावले कि सर्वत्र घरातील स्पर्धकांबद्दलच बोलताना दिसतात. जसे जसे दिवस सुरू लागले आहेत हा कार्क्रम खऱ्या अर्थाने रंग घेतोय आणि स्पर्धकांचे खरे रंग दाखवतोय. अश्यातच घरात स्पर्धक म्हणून आलेली कीर्तनकार शिवलीला पाटील तब्येतीच्या अस्वस्थतेमुळे अगदी आठवड्याभरातच घराबाहेर झाली आणि घरातील एक स्पर्धक कमी झाला. यामुळे तिची जागा तशीच ओस पडली आहे. मग हि जागा भरायला नको? म्हणूनच आता घरात एक हटके आणि गोंडस वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.

शिवलीलाची रिती जागा भरायला एक नवा वाईल्ड कार्ड पाहुणा ‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात ग्रँड एण्ट्री करणार आहे. अर्थात उर्वरित १४ सदस्यांसाठी हे एकदम मोठे सरप्राईज आणि एक नव्हे आव्हानच असणार आहे. कारण नक्कीच आता कॉम्पिटिशन आणखी तगडी होणार. शनिवारच्या ‘बिग बॉस चावडी’ स्पेशल भागात हा वाईल्ड कार्ड शोमध्ये आणि घरात एण्ट्री करेल. हा स्पर्धक आहे तरी कोण? अशी धाकधूक वाढली ना? तर फार न तंटा आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि अभिनेता आदिश वैद्य हा ‘बिग बॉस मराठी ३ चा नवा स्पर्धक आणि वाईल्ड कार्ड एंट्री असणार आहे.

अभिनेता आदिश वैद्य मराठी टीव्ही इंडस्ट्रीमधील खूप लोकप्रिय नाव आहे. त्याने ‘रात्रीस खेळ चाले १’, ‘कुंकू टिकली आणि टॅटू’, ‘जिंदगी नॉट आऊट’ सारख्या प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ‘सेक्स वेब ड्रग्स आणि थिएटर’ या मराठी वेब सीरिजमध्येही त्याने काम केले आहे. सध्या तो ‘गुम है किसी की प्यार मे’ या हिंदी मालिकेत काम करताना दिसत होता. पण कदाचित बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होण्यासाठी त्याने हि मालिका नुकतीच सोडली आहे. सध्या बिग बॉस मराठीच्या घरात विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाणे, सुरेखा कुडची, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे हे स्पर्धक चुरशीने खेळताना दिसत आहेत. आता यांच्यासोबत आदिश देखील स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे. त्यामुळे बिग बॉसचा खेळ आता आणखीच रंगत घेणार यात काहीच शंका नाही.