Take a fresh look at your lifestyle.

Bigg Boss OTT – ‘नो अक्षरा, नो बिग बॉस’; अक्षरा सिंगच्या एव्हिक्शनवर चाहते संतापले

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस ओटीटी’ने गेल्या काही आठवड्यांपासून चाहत्यांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. पण यानंतर एक एक करून जसे स्पर्धक एव्हिक्ट होताना दिसत आहेत. त्यानंतर काल रविवारी ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये असं काही घडलं की बस…. होय, काल रविवारी दोन स्पर्धकांना बिग बॉसच्या घरातून बेघर करण्यात आलं. शोचा होस्ट करण जोहर याने पंजाबी गायक मिलिंद गाबा व भोजपुरी स्टार अक्षरा सिंग या दोघांनाही एलिमिनेट केले आहे. या एलिमिनेशनमुळे चाहते मात्र नाराज झाले आहेत.

 

कारण मिलिंद गाबाचं एलिमिनेशन कदाचित चाहत्यांना अपेक्षित होत पण अक्षराचे एव्हिक्शन काही चाहत्यांना पटलेही नाही आणि रुचलेही नाही. मग काय? सोशल मीडियावर शोच्या मेकर्सची चांगलीच वाट लावली.

दरम्यान शोच्या होस्टवरही खूप टीका झाल्या. चांगल्या स्पर्धकांना विनाकारण शो बाहेर करणं सुरू आहे, हा शो पक्षपाती आहे. करण जोहर फक्त आपल्या आवडत्या स्पर्धकांची बाजू घेतो, अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या. अक्षरा बिग बॉसमधून बाहेर पडताच चाहत्यांनी अक्षराला पुन्हा शोमध्ये परत आणण्याची मागणी केली आहे. अक्षरा सिंग शो बाहेर, हे मी स्वीकारूच शकतं नाही, चांगल्या व्यक्तिंनाच नेहमी शोमध्ये पक्षपाती वागणूक का मिळते? अश्या पद्धतीने सवाल करीत शोच्या मेकर्सवर चाहत्यांनी टीका केल्या आहेत.

आम्हाला अक्षरा सिंग हवी. नो अक्षरा, नो बिग बॉस, अशी कमेंट एका युजरने केली आहे. शिवाय अनेकांनी तर बिग बॉस ओटीटीवर बहिष्कार टाकण्याची मागणीही यानिमित्ताने केली आहे. ‘बिग बॉस ओटीटी’बद्दल आणखी काही सांगायचं तर ८ ऑगस्ट २०२१ पासून सुरू झालेला हा शो ६ आठवड्यांपर्यंत चालणार आहे. आता या शो चे ४ आठवडे पूर्ण झाले असून शोची लोकप्रियता प्रचंड आहे.

तूर्तास शमिता शेट्टी, नेहा भसीन, राकेश बापट, मूस जट्टाना, दिव्या अग्रवाल, प्रतीक सहजपाल व निशांत भट असे ७ स्पर्धक शोमध्ये टिकून आहेत. या सर्व स्पर्धकांची फॅन फॉलोईंग अलग लेव्हलची आहे. आता बिग बॉस १५ मध्ये यापैकी कोण कोण पोहोचणार हि बाब उत्सुकतेची आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.