Take a fresh look at your lifestyle.

BB OTT- ‘सौतन कि लाली, मुह पे गिरी गाली’; दिव्याचा लीप बाम राकेशच्या खिश्यात पाहून शमिचा चढला पारा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस OTT’च्या घरातले कनेक्शन्स रोज वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. यातील राकेश बापट आणि श्मिट शेट्टी यांची जोडी तर प्रेक्षकांना इतकी भावू लागलीये का काय सांगायचं ह्यांच्याबद्दल. क्युट शमिता आणि म्यूट राकेश अशी हि लवी डवी जोडी सध्या रोमँटिक चर्चांचा विषय ठरली आहे. जस कि, सकाळी उठल्या उठल्या राकेशचं शमिताला किस करण मग दिवसभर तिची काळजी घेण आणि रात्री तिचे पाय चेपून देणं बापरे… ! आता एकीकडे राकेश शमिताची एवढी केअर करतोय पण शमि? तीसुद्धा त्याच्यासाठी काहीही करायला तयार होते. आता पहा ना. दिव्याचा एक छोटुसा लीप बाम राकेशच्या खिशात काय सापडला आणि शमिताचा पारा काय चढला. मग जो ड्रामा झाला तो पाहून प्रेक्षकांच्याही मनात गुदगुल्या झाल्या असतील.

त्याचं झालं असं की, बिग बॉस ओटीटीचे सगळे स्पर्धक लिविंग एरियात बसले होते. यादरम्यान अचानक राकेशच्या खिश्यातील लिप बाम खाली पडलं. ते पाहून आधी सगळ्यांनाच ते शमिताचं असेल, असच वाटलं. त्यामुळे सगळे राकेशला चिडवू लागले. दरम्यान राकेशने हे लिपबाम शमिताचं नाही दिव्याचं आहे असं सांगितलं आणि हे ऐकून शमिताच्या चेह-यावरचे हावभावच बदलले. मग काय? शमिताचा पारा चांगलाच चढला आणि मग राकेशची फुल्ल वाट लागली. तू दिव्याचं लिपबाम घेतलसच का? शमिता शेट्टीकडे मेकअपची कमी आहे का? असं शमिता रागारागात त्याला बोलताना दिसली. अहो इतकेच काय तर, मला जे लोक आवडतात, त्यांच्याबद्दल मी प्रचंड पजेसिव्ह आहे, असंही श्मिट म्हणाली. यानंतर बिचारा राकेश शमिताला समजवण्याचा प्रयत्न करत राहिला आणि तिचा राग निवळावा म्हणून शमिताच्या गालावर किस करतानाही दिसला. पण शमिताच्या डोक्यात दिव्याचा लिपबाम चांगलाच फिरत होता.

अलीकडेच, किचनची ड्युटी करून शमिता फार थकली होती म्हणून राकेश तिचे पाय चेपताना दिसला होता. राकेश नेहमीच तिची कोणत्या ना कोणत्या पद्धतीने काळजी घेताना दिसतो. कधी इमोशनली शमिता कमजोर झाली तर राकेश तिला लगेच सावरून घेतो. त्यांचे अनेक प्रेमळ आणि क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. यामुळे राकेश शमिता प्रचंड फॅन्सचे प्रेम मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. तसे पहिल्या आठवड्यात त्यांचे खटके उडाले होते. पण दुस-या आठवड्यात दोघांमध्ये असे काही प्रेमाचे वारे वाहिले कि ते दोघेही आता एकमेकांसोबतच दिसतात. अगदी पर्सनल लाईफमधील गोष्टी शेअर करण्यापासून ते टास्कमध्ये एकमेकांना साथ देण्यापर्यंत दोघ एकमेकांची साथ सोडत नाहीत हेच दिसून येतंय.

Leave A Reply

Your email address will not be published.