Take a fresh look at your lifestyle.

BiggBoss 15 ‘तू इडियट तुझा संपूर्ण..’; अभिजित बिचूकले आणि रश्मी देसाईचा नवा पंगा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठी ‘बिग बॉस’ सिझन २ गाजवल्यानंतर अभिजित बिचुकले सध्या हिंदी ‘बिग बॉस’ सिझन १५ मध्ये प्रचंड दंगा, धुडघुस आणि धुमाकूळ घातलाना दिसत आहे. दररोज नवीन स्पर्धकासोबत राडे करण्यात बीचुकले एक नंबर आहे. कारण त्यांची बोलायची शैली, आक्रमकपणा, विनोदी वृत्ती कधी मनोरंजनाचा बहार आणते तर कधी भांडणाची नांदी फुंकते. असेच काहीसे यावेळी सुद्धा झाले आहे. यावेळी बीचुकलेच्या निशाण्यावर सह स्पर्धक रश्मी देसाई आली आहे. यावेळी रश्मी आणि बीचुकलेमध्ये राडा झाला आहे.

त्याच झालं अस की, येत्या एपिसोडमध्ये काही पत्रकार घरात आलेले दिसतील. यानंतर घरातल्यांना प्रश्न विचारताना दिसतील. यावेळी रश्मी देसाई अभिजित बिचुकलेंवर भडकताना दिसेल. बिचुकले महिलांप्रती वाईट विचार करतात, असं रश्मी यावेळी बोलताना दिसतेय आणि बस मग काय..? दादा पेटले ना… होय. रश्मीच्या याच वक्तव्यानंतर अभिजित बिचुकले भडकून बोलतात की “हे वारंवार बोलून माझी इमेज डॅमेज केली जात आहे. यावर रश्मी कुठली गप्प बसतेय. ती लगेच बिचुकलेला इडियट असं म्हणते. तर त्यावर बिचुकले रश्मीला तू इडियट तुझा संपूर्ण परिवार इडियट असं म्हणताना दिसेल.

विशेष सांगायचं म्हणजे अभिजित एवढ्यावरच थांबत नाही. तर कार्यक्रमात आलेल्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित पत्रकारांशी देखील वाद घालताना दिसेल. त्यावर सलमान खान अभिजीत गप्प बस असे बोलताना दिसतो. तर रविवारच्या एपिसोडचा हा प्रोमो बघितल्यानंतर एपिसोडमध्ये भरपूर भन्नाट भारी आणि मनोरंजन करणारे किस्से घडणार आहेत याची कल्पना येत आहे.