हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर या जोडप्याने अखेर आपण आई- बाबा होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून हि केवळ एक चर्चा होती. पण आता बिपाशाने बेबी बंप फोटो शेअर केल्यानंतर या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. हे फोटो शेअर करत बिपाशाने आपला आनंद व्यक्त केला आहे. या फोटोंमध्ये तसा तिच्या आणि तिच्या पतीच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आई बाबा होण्याची भावना अतिशय प्रखरपणे दिसत आहे.
बिपाशा आणि करणचे हे फोटोशूट कमालीचे व्हायरल होत आहे. यामध्ये दोघेही अतिशय गोड आणि आनंदी दिसत आहेत. बिपाशाच्या चेहऱ्यावरील आनंद तर पाहण्याजोगा आहे. या फोटोमध्ये करण बिपाशाला घट्ट मिठी मारून उभा आहे. तर दुसऱ्या फोटोत बेबी बंपवर किस करताना दिसतो आहे. यामध्ये दोघांनीही शुभ्र रंगाचे कपडे परिधान केले आहेत. हे फोटो बिपाशाने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि त्यासोबत एक छान असं कॅप्शनही दिलं आहे. या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देत तिच्या आनंदात सहभाग घेतला आहे.
अभिनेत्री बिपाशा बासूने हि पोस्ट शेअर करत लिहिलं आहे कि, ‘नवी वेळ, नवी सुरुवात आणि नवा प्रकाश आमच्या आयुष्यामध्ये आला आहे. आम्ही दोघांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आणि तेव्हापासून आम्ही फक्त दोघंच आहोत. एकमेकांवरच खूप प्रेम करायचं हे थोडं आता अयोग्य वाटलं. म्हणून आता लवकरच आम्ही दोनाचे तीन होणार आहोत. लवकरच आमचं बाळ आमच्याबरोबर असेल आणि आमचा आनंद द्विगुणीत होईल.
‘तुम्ही आमच्यावर बिनशर्त प्रेम केल्याबद्दल, तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद, त्या कायमच आमच्या सोबत असतील. आमच्या जीवनाचा एक भाग बनल्याबद्दल धन्यवाद.. लवकरच आमच्यासोबत एक जीव जोडला जाणार आहे ते म्हणजे आमचं बाळ.. दुर्गा दुर्गा’ हि पोस्ट पाहून तिला झालेला आनंद हा गगनात न मावणारा आहे हे समजत आहे. बाळ होणे हि अतिशय असामान्य आणि अद्वितीय आनंद देणारी बाब आहे. त्यामुळे सगळंच कसं नवंनवं आणि हवंहवं वाटत असत.
Discussion about this post