Take a fresh look at your lifestyle.

बर्थडे बॉय सलमान खानने शुभेच्छांसाठी चाहत्यांचे मानले आभार; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज बॉलिवूडचा दबंग अभिनेता अर्थात चाहत्यांचा लाडका भाईजान सलमान खानचा ५६ वा वाढदिवस आहे. यामुळे साहजिकच जगभरातून सलमानचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला भरभरून शुभेच्छा देत आहेत. सलमान गेली ३३ वर्ष सिने इंडस्ट्रीमध्ये घट्ट पाय रोवून कार्यरत असणारा अभिनेता आहे. यामुळे त्याचा चाहतावर्गदेखील अतिशय मोठा आहे. सध्या ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक अश्या प्रत्येक सोशल मीडिया ऍपवर पाहिलं तर फक्त आणि फक्त हॅपी बर्थडे सलमान खान आणि हॅपी बर्थडे भाईजान हा हॅशटॅग ट्रेंड करतोय. दरवर्षी सलमान आपल्या चाहत्यांना बांद्रा येथील निवासस्थानी झलक देतो. मात्र यावेळी तो आपल्या फार्महाऊसवर असल्यामुळे त्याने प्रसार माध्यमांद्वारे चाहत्यांच्या प्रेमाचे आणि शुभेच्छांचे आभार मानले आहेत.

बीइंग ह्युमन हा सलमान खानचा अधिकृत ब्रँड आहे. त्यामुळे आज भाईजानचा बर्थडे म्हणून बीइंग ह्युमन च्या प्रोडक्ट्सच्या किमतीत मोठी सूट मिळत आहे. म्हणून सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करीत याची माहिती खुद्द सलमानने दिली आह. या व्हिडिओच्या कॅप्शनमधून चाहत्यांचा लाडका भाईजान आपल्या सोशल मीडियावरून सर्व चाहत्यांना त्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी धन्यवाददेखील देतोय.

या कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, तुमच्या सर्व प्रेमळ शुभेच्छांबद्दल धन्यवाद, मला किती आनंद आणि आशीर्वाद मिळाले आहेत आणि मला काय वाटतंय याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. म्हणूनच माझ्या वाढदिवसानिमित्त “आज की पार्टी मेरी तरफ से!”

सध्या सलमान खान आपल्या पनवेलच्या फार्म हाऊसवर बर्थडे आणि न्यू ईअर च्या सेलिब्रेशनची तयारी करतोय. दरम्यान रविवारी त्याच्या फार्महाऊसमध्ये साप शिरला होता आणि या सापाने सलमानला दंश केल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. यानंतर आज माध्यमांच्या सानिध्यातून भाईजानने चाहत्यांची चिंता देखील मिटवली आहे.

तो म्हणाला, माझ्या फार्महाऊसमध्ये साप घुसला होता, मी काठीने त्याला बाहेर काढले. हळूहळू तो माझ्या हातात आला. मग मी त्याला सोडण्यासाठी पकडले आणि तेव्हाच त्याने मला तीनदा चावा घेतला. हा एक प्रकारचा विषारी साप होता. मी ६ तास रुग्णालयात उपचारार्थ दाखल होतो…पण मी आता ठीक आहे