Take a fresh look at your lifestyle.

वाढदिवस विशेष : रोमान्सचा बादशाह शाहरुख खान बद्दल जाणून घेऊ रंजक गोष्टी

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | ज्या काळात बॉलीवूड मध्ये घराणेशाही वरून आरोप प्रत्यारोप होत आहे, त्यांच्यासाठी बाहेरील व्यक्ती म्हणून शाहरूख खान प्रेरणास्थानी असायला हवा. दिल्लीतुन मुंबईला येऊन शाहरुखने आपलं नाण खणखणीत आहे हे सर्वांना दाखवून दिले.आज 2 नोव्हेंबरला बॉलीवूडचा हा किंग खान आपला 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. जरवर्षी किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शाहरुखचे चाहते मन्नत बाहेर येऊन शाहरुखला शुभेच्छा देतात जर वर्षी मन्नत बाहेर लाखो चाहत्यांची गर्दी पाहायला मिळते.

दरम्यान ‘इस बार का प्यार थोडा दूर से यार’ असं म्हणत शाहरुखने चाहत्यांना कोविड – १९ मुळे कोणीही माझ्या वाढदिवसाला, मुंबईतील मन्नत बंगल्याबाहेर बाहेर गर्दी करू नये, असं भावनिक आवाहन केलं होत. शाहरुखने चाहत्यांना, वाढदिवसाच्या काही दिवस आधीच कोविडमुळे गर्दी न करण्याचं आवाहन केलं होत.

पुरस्कारांचा राजा –

शाहरुख खानने केवळ चांगले चित्रपट केले नाहीत तर चित्रपटांच्या माध्यमातून समीक्षकांची मने जिंकली आहेत. त्याने प्रत्येक वेळी सिद्ध केले की त्याला किंग खान का म्हंटल जाते. पुरस्कारांविषयी बोलायचं झालं तर शाहरूख खानने आतापर्यंत फिल्मफेअर पुरस्कार तब्बल 14 वेळा मिळविला आहे. याशिवाय त्यांना 30 वेळा नामांकन व विशेष पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे 8 फिल्मफेअर पुरस्कार त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत स्थान दिले आहे. याबाबतीत शाहरुख खानने जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्याशी बरोबरी केली आहे.

राष्ट्रीय पुरस्काराची अजूनही प्रतीक्षा

राष्ट्रीय पुरस्कार हा नेहमीच अभिनेत्यांचा प्रतिष्ठित सन्मान असतो. सातत्याने चांगले चित्रपट करूनही शाहरुख खानला अजूनही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाही. तथापि, भारत सरकारने त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले होते.

तब्बल एवढी आहे संपत्ती

शाहरूख अ‍ॅक्टिंगमध्येच नाही तर बिझनेसमध्येही नंबर 1 आहे. कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीसोबत लक्झरी कारचा मालक आहे. 2017च्या फोर्ब्स रिपोर्टनुसार, शाहरूखची एकूण संपत्ती 600 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 4200 कोटी रूपये आहे. 2018 मध्ये तो देशातील सर्वात श्रीमंत अभिनेता रला होता. मुंबईत त्याचा मन्नत नावाचा बंगला आहे. आजघडीला या बंगल्याची किंमत 200 कोटी रूपये आहे. अलिबाग येथे त्याचे फार्महाऊस आहे. याची किंमतही कोट्यवधीच्या घरात आहे. याशिवाय दुबई, लंडनमध्ये त्याचे अलिशान बंगले आहेत. याची किंमत 170 कोटी रूपये आहे.

ब्रकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.