Take a fresh look at your lifestyle.

वाढदिवस विशेष : जाणून घेऊ अभिनेत्री रविना टंडनबद्दलचे कधीही न ऐकलेले किस्से

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | एकेकाळची बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री …आपल्या अभिनय आणि मनमोहक अदांनी 90’s मध्ये सर्वांचं मन जिंकणाऱ्या रवीना टंडनचा आज 46 वा वाढदिवस आहे. 90 च्या दशकात रविनाने अनेक जबरदस्त चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दलचे कधीही न ऐकलेले किस्से जाणून घ्या.

रवीनाचा जन्म 26 ऑक्टोबर 1974 ला मुंबईत झाला. तिचं संपूर्ण शिक्षणही इथेच झालं. ती कॉलेजमध्ये असताना तिला मॉडेलिंगच्या ऑफर मिळू लागल्या. मॉडेलिंगमध्ये करिअर करायचे ठरवल्यानंतर तिने महाविद्यालयीन शिक्षण मध्येच सोडून दिलं. 1991 साली प्रदर्शित झालेल्या ‘पत्थर के फूल’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. पहिल्याच चित्रपटासाठी तिने फिल्मफेअर पुरस्कारही मिळवला.

रवीनाने ‘मोहरा’, ‘दिलवाले’ आणि ‘लाडला’ सारखे चित्रपट केले, या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं. तिच्या करिअरमध्ये तिने बिग बी अमिताभ बच्चन, गोविंदा, अक्षय कुमार, अजय देवगण सारख्या कलाकारांसोबत काम केलं आहे.

रवीनाचं नाव घेतल्यानंतर प्रत्येकाला तिचं ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणं डोळ्यासमोर येतं. या गाण्याने तिला वेगळी ओळख निर्माण करुन दिली. असं म्हटलं जातं की, या गाण्याच्या शुटिंगवेळी रवीना तापाने फणफणत होती, तसेच तेव्हा तिचे पिरियड्सही सुरु होते. तरीदेखील रवीनाने एक अप्रतिम गाणं शुट केलं.

‘केजीएफ 2’ मध्ये रवीना टंडन आणि अभिनेता संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात अभिनेत्री रवीना टंडन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’