Take a fresh look at your lifestyle.

दिग्गज अभिनेत्री रेखा यांचा आज वाढदिवस ; जाणून घेऊ रेखा बद्दल काही रंजक गोष्टी

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेत्री भानुरेखा गणेशन ऊर्फ रेखा यांचा आज वाढदिवस.. रेखा यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका केल्या आहेत. रेखा यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 साली चेन्नईत झाला. त्यांचे वडील जेमिनी गणेशन तमिळ अभिनेते होते आणि आई पुष्पावली तेलुगू अभिनेत्री होती. 1966 पासून त्यांनी सिनेमात काम करायला सुरावात केली. रेखा यांनी हिंदीसोबतच तामिळ, तेलगू आणि कानडी भाषेत 180 हून अधिक सिनेमामंध्ये काम केले आहे.

वयाच्या १२ व्या वर्षी रेखा यांनी बाल कलाकार म्हणून अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. सदाबहार रेखा आजही त्यांच्या सौंदर्यासोबतच अभिनयामुळे चाहत्यांच्या मनावर जादू करताना दिसतात. मात्र करिअरच्या चर्चांसोबतच रेखा यांचे खासगी आयुष्यही कायम चर्चेत होते.

रिअल लाइफशिवाय रेखा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीसुद्धा चर्चेत राहिली आहे. त्यांचे दोन विवाह झाले होते. पहिला विवाह अभिनेता विनोद मेहरा यांच्या सोबत झाला होता परंतु त्याच्या आईने रेखा यांना स्वीकारण्यास नकार दिला.

तिचे दुसर लग्न उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी झाले होते, लग्नानंतर थोड्या दिवसात त्यानी आत्महत्या केली. त्यानंतर रेखाला सर्व लोकांनी व्हॅम्प टॅग दिला. तथापि, जशी जशी वेळ गेली तशी तशी रेखा यातून सावरली.

रेखा या आपल्या अभिनयामुळे तर प्रसिद्ध आहेतच. पण सोबतच त्यांच्या सौंदर्याविषयी चर्चा केल्याशिवाय कोण राहणार नाही.त्यांची सुंदर त्वचा आणि दाट केस यामुळे त्या नेहमीच कौतुकास पात्र ठरत असून त्या आपल्या फिटनेसचीही तितकीच काळजी घेतात. अर्थात त्या जरी जिममध्ये जाताना दिसत नसल्या तरी त्या नेहमी व्यायाम आणि योगा करतात. एका प्रसिद्ध झालेल्या वृत्तातून ही माहिती समोर आली आहे.

रेखा सध्या राज्यसभा सदस्य आहेत. राष्ट्रपतींच्या विशेष अधिकाराने मे 20212 मध्ये त्यांची राज्यसभेवर नेमणूक झाली. खूबसूरत, खून भरी मांग, खिलाडियों का खिलाडी, उत्सव, मुकद्दर का सिकंदर आणि उमराव जान’ या चित्रपटांमधील रेखाच्या भूमिका विशेष गाजल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’