Take a fresh look at your lifestyle.

Happy Birthday Nana Patekar : प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | आज 1 जानेवारी नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा वाढदिवस नाना आज आपला 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत. नाना पाटेकर आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्याच्या चित्रपटांचे अनेक संवाद आजही लोकांना आठवतात.

अभिनय विश्वात काही कलाकार त्यांच्या अभिनयामुळे तर काही मात्र त्यांच्या नावामुळे ओळखले जातात, पण यातच एक वर्ग असा असतो जो आपलं नाव आणि अभिनयाची कला या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अधिकाधिक संपन्न करत असतो. अशाच काही चेहऱ्यांपैकी असणारं एक नाव म्हणजे अभिनेते नाना पाटेकर यांचं.

क्रांतावीर’, ‘वेलकम’, ‘तिरंगा’, ‘पक पक पकाक ‘, ‘नटसम्राट’, ‘परिंदा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारून अभिनेते नाना पाटेकर यांनी चाहत्यांच्या मनात घर केलं. कला विश्वात आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी त्यांनी प्रचंड खस्ता खाल्ला. एक कलासत्क अभिनेता म्हणजे काय, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नाना, असंच अनेकांचं म्हणणं आहे. अशा या अभिनेत्याला त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये बऱ्याच मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.