Take a fresh look at your lifestyle.

‘तांडव’ वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात ; हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा भाजपकडून आरोप

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याची ‘तांडव’ ही वेब सीरिज सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या वेबसिरीजमध्ये हिंदू विरोधी कंटेंट असल्याचा आणि हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे त्यामुळे ही वेब सीरिज बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे.

दरम्यान, भाजप आमदार मनोज कोटक यांनीही या वेबसिरीजला विरोध दर्शवला आहे. वेबसिरिजमध्ये हिंदू देवदेवतांचा अपमान करण्यात आला असून, त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे या वेबसिरीजवर बंदी घालण्यात यावी आणि वेबसिरीजच्या निर्मात्याने माफी मागावी अशी मागणी कोटक यांनी केली आहे. तसं पत्रच त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लिहिलं आहे. त्यामुळे आता जावडेकर या वेबसिरीजबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

तांडव’च्या पहिल्याच एपिसोडमध्ये भगवान शंकर आणि श्रीराम या हिंदू देव-देवतांची हेटाळणी करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर सोशल मीडियावर #BoycottBollywood आणि #BoycottTandav हे दोन हॅशटॅग ट्रेण्ड होत आहेत. या वेब सीरीजमध्ये डिंपल कपाडिया, दिनो मोरिया, तिग्मांशू धुलिया, गौहर खान, मोहम्मद झीशान, कृतिका कामरा, सुनील ग्रोहर, अनूप जोशी, कुमुद मिश्रा हे महत्वपूर्ण भूमिकेत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.