Take a fresh look at your lifestyle.

सुशांतला विष देऊन मारले???; सुब्रमण्यम स्वामींचा खळबळजनक दावा

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यु प्रकरणाचा तपास सीबीआय पथक करत असून आता या प्रकरणाशी रोज नवनवीन मुद्दे आणि घटना समोर येत आहेत.भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम  स्वामी नेहमीच या प्रकरणा संबधी ट्विटरच्या च्या माध्यमातून सुशांतला न्याय देण्याचा मागणीला पाठिंबा देत असतात. अशातच आता त्यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. सुशांतसिंह राजपूत याच्यावर विषप्रयोग केला गेल्यामुळे त्याचे शवविच्छेदन उशिरा करण्यात आले. जेणेकरून हे विष ठराविक काळानंतर पोटात विरघळून जाईल हा यामागील उद्देश असून, याला जबाबदार असणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची हीच वेळ आहे, असे सुब्रमण्यन स्वामी यांनी म्हटले आहे.

सुब्रमण्यम  स्वामी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘आता सैतानी मारेकऱ्यांची मानसिकता आणि त्यांची मजल कुठपर्यंत गेलेली आहे, हे हळूहळू उघड होत आहे. सुशांतसिंह राजपूतच्या पोटात विष विरघळून जावे आणि ते ओळखता येऊ नये, यासाठी त्याचे शवविच्छेदन मुद्दाम उशिरा केले गेले. जबाबदार असलेल्यांना पकडण्याची हीच वेळ आहे.’

या पूर्वीच्या एका ट्विटमध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हणले होते की दुबईचा ड्रग डीलर अय्याश खान सुशांतचा खून झाला त्याच दिवशी सुशांतला कशासाठी भेटला, असा प्रश्नही सुब्रमण्यन स्वामी यांनी विचारला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’