Take a fresh look at your lifestyle.

मृत्युपूर्वी सुशांत दुबईच्या ‘या’ धोकादायक व्यक्तीला भेटला होता ; सुब्रमण्यम स्वामी यांचे खळबळजनक ट्विट

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिल्यानंतर सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. असं असलं तरी सुशांत सिंग कसा मृत्यु पावला? खून की आत्महत्या? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी सीबीआयची विशेष टीम मुंबईत शोध घेत आहे. एक एक करून लोकांची विचारपूस करत आहे. सिद्धार्थ पिठानी आणि त्याचा कूक नीरज सध्या चौकशीत आहेत. दरम्यान, सुशांतचा मृत्यू ‘हत्या’ असल्याचे भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचे म्हणणे आहे.यासह, त्याच्या मृत्यूचा दुबईच्या ड्रग विक्रेत्याशीही संबंध आहे.

काही दिवसांपूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनी टाईम्स नाऊशी बोलताना सांगितले की सुशांतची हत्या अत्यंत नियोजन करून करण्यात आली आहे. त्याचवेळी पैशांच्या व्यवहारासाठी तो दुबईमध्येही अडकला होता. आता ट्विटमध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी दुबईच्या ड्रग डीलरचे नाव घेतले आहे. त्यांनी लिहिले, “सुनंदा पुष्करच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एम्सच्या डॉक्टरांच्या पोस्टमॉर्टम दरम्यान तिच्या पोटात काय सापडले? पण श्रीदेवी आणि सुशांतच्या बाबतीत असं काही घडलं नाही.सुशांतला ड्रग विक्रेता आयुष खान त्याच्या मृत्यूच्या दिवशी त्याला का भेटला??

सीबीआयचे विशेष तपास पथक या प्रकरणाशी संबंधित वेगवेगळ्या लोकांची चौकशी करत आहे. सुशांत सिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयची टीम गुरुवारी मुंबईत आली. सीबीआयच्या टीममध्ये फॉरेन्सिक तज्ञ आणि वरिष्ठ अधिकारी सुद्धा आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’