Take a fresh look at your lifestyle.

आता ऑनलाइन मिळणार रक्त ; सोनू सूद राबवणार नवा उपक्रम

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेता सोनू सूद हा गेल्या वर्षभरापासून देशभरातील लोकांना अनेक प्रकारे मदत करताना दिसला. मग ते लॉकडाउन मध्ये अडकलेल्या मजुरांना घरी पाठवणे असो किंवा त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे असो….किंवा गरीब मुलांना नोकरीची सोय करणे असो सोनू सूद प्रत्येक वेळी गरिबांसाठी धावून गेला. सोनू सूद लवकरच ऑनलाईन ब्लड बँक सुरू करणार आहे.

सोनू सूदने ट्विट करत यासंदर्भातला एक व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, देशभरात दरवर्षी 12 हजार रुग्ण रक्त न मिळाल्यानं मृत्यूमुखी पडतात. एखाद्याचा जीव वाचवायचा असेल, तर तुम्हाला डॉक्टरच असायला हवं असं नाही, रक्तदानाच्या माध्यमातूनही तुम्हा एखाद्याचे प्राण बचावू शकता, असा संदेश सोनू सूदने दिला आहे.

ब्लड बँकेत जा, रक्ताचा गट शोधा, नाही मिळाला तर पुन्हा दुसरीकडे जा, इतका खटाटोप करण्यापेक्षा एका अॅपच्या माध्यमातूनच दाता शोधणं सहज शक्य होईल, असं सोनू इंडो एशियन न्यूज सर्व्हिसेसला म्हणाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave A Reply

Your email address will not be published.