Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता सोनू सूदवर मुंबई महापालिकेची कारवाई ; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. जुहू येथील सहामजली निवासी इमारत आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतरित केल्याचा आरोप सोनू सूद वर मुंबई महापालिकेकडून करण्यात आला आहे.

दरम्यान सोनू सूदने आपल्याकडे महापालिकेची परवानगी असून महाराष्ट्र किनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीची वाट पाहत असल्याचं म्हटलं आहे.

महापालिकेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, “सोनू सूदने जुहूमधील परवानगी न घेता एबी नायर रोडवर असणारी सहा माळ्यांची रहिवासी इमारत शक्ती सागर बिल्डिंगचं रुपांतर हॉटेलमध्ये केलं आहे”. नोटीस देण्यात आल्यानंतरही सोनू सूदने बेकायदेशीर बांधकाम सुरु ठेवण्यात आल्याचा आरोप पालिकेने केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.