Take a fresh look at your lifestyle.

मुंबई पालिका आयुक्तांच्या भावाकडून गायक सोनू निगमला धमकीचे मेसेज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या भावाने बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध गायक सोनू निगम याला धमकीचे मेसेज केल्याचे समोर आले आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या भावाचे नाव रजिंदर असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इक्बाल सिंग चहल यांनी त्यांचा भाऊ राजिंदरसाठी सोनूला कार्यक्रम करण्याची विनंती केली होती. मात्र सोनू सध्या वैयक्तिक कामात व्यस्त असल्याने त्याने काही आंतरराष्ट्रीय कलाकारांची नावे सुचवली होती. मात्र हि बाब रजिंदर यांना आवडली नाही आणि त्यांनी सोनूला काही आक्षेपार्ह मेसेज केले. यांतील भाषा योग्य नसून यात सोनूला धमकी देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ArtistAloud.com (@artistaloud)

पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा भाऊ रजिंदर याने सोनू निगमला धमकी दिली. यामागील कारण केवळ राजिंदर यांच्या साठी सोनुने कार्यक्रम करता येणार नाही असे सांगितले. शिवाय आपण कामात व्यस्त आहोत मात्र सोबत काही आंतरराष्ट्रीय कलाकारांची नावे सुचविली. हि बाब इक्बाल सिंग चहल यांच्या भावाला अर्थात राजिंदर याना काही रुचली नाही. परिणामी त्यांनी सोनू निगमला काही मेसेजेस केले. या मेसेजमधील भाषा अत्यंत आक्षेपार्ह आणि धमकीसुचक होती.

या सर्व प्रकरणामुळे गायक सोनू निगमला मानसिक त्रास होतोय. यामुळे संबंधित प्रकरणी लवकरात लवकर तोडगा निघावा अशी त्याची इच्छा आहे. याबाबत स्वतः गायक सोनू निगमने या मेसेजसचे काही स्क्रिनशॉटही सार्वजनिक केले आहेत. रजिंदर हे सध्या इक्बाल सिंह चहल यांच्याचसोबत राहत असल्याची माहिती मिळत आहे. सोनू निगम हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील नावाजलेला प्रसिद्ध गायक आहे. त्याने अनेक गाणी गायली आहेत. अगदी हिंदीसोबत मराठीतही त्याने बरीच गाणी गायली आहेत. नुकताच त्याला पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.