Take a fresh look at your lifestyle.

आश्रम सीरिजमध्ये हिंदुत्वाचा अपमान केलाय…?; आरोपांवर व्यक्त झाला अभिनेता बॉबी देओल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर गेल्या काही दिवसांपूर्वी आश्रम या बहुचर्चित वेब सीरिजचा तिसरा भाग प्रदर्शित झालं. दिनांक ३ जून २०२२ रोजी ‘आश्रम ३’ वेब सीरिज रिलीज झाली. अनेकांनी वेब सिरिजला चांगली प्रतिक्रिया दिली आहे. पण अनेकांनी वेब सिरिजवर चिखल उडविण्याचे काम केले आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेता बॉबी देओल, ईशा गुप्ता, अनुप्रिया गोयंका, त्रिधा चौधरी, तुशार पांडे यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. अत्यंत गाजलेली ही वेब सीरिज सुद्धा भयंकर ट्रोल होत आहे. दुर्दैव म्हणजे पहिल्या सिजनपासूनच या सीरिजवर हिंदूत्वाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आलाय. इतकेच काय तर दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यावरही आरोपांवर आरोप केले जात आहेत. अखेर यावर अभिनेता बॉबी देओलने प्रतिक्रिया दिली आहे.

आश्रम ३’ या वेब सीरिजमधे एका ढोंगी बाबाची कथा आणि त्याच्या हव्यासाची व्यथा दाखवली आहे. यामध्ये अभिनेता बॉबी देओल याने ढोंगी बाबा निरालाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे या वेब सीरिजचा बॉबी एक महत्वाचा भाग आहे. दरम्यान एका मुलाखतीत बॉबी देओल म्हणाला की, “हा शो इतका चाललाय म्हणजे नक्कीच प्रेक्षक या शो ला बघत आहेत. काही टक्केच लोकांना ही सीरिज आवडली नसेल. प्रत्येकाला स्वत:ची वेगळी मतं असू शकतात. त्यामुळे एखाद्याला व्यक्त होण्यापासून आपण रोखू शकत नाही. तुम्ही या सीरिजचं यश बघितलंत तर तुमच्या लक्षात येईल की या सीरिजमधे काहीचं चूकीचं दाखवलेलं नाही.”

याआधी एका मुलाखतीत आश्रम या वेब सिरिजचे दिग्दर्शक प्रकाश झा यांनीही आपली वैयक्तिक भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते की,”भारतात धर्माविषयी एक उत्तम ओळ म्हटली जाते. माणूस धर्माला नाही वाचवू शकत तर धर्म माणसाला वाचवतो. त्यामुळे ज्यांनाही असं वाटतं की आपण धर्माला वाचवतोय तो त्यांचा केवळ गैरसमज आहे. सध्या एम एक्स प्लेअर वर आश्रम ३’ ही वेब सिरीज चांगलीच वाजता दिसतेय. मुख्य म्हणजे आतापर्यंत या तिन्ही पर्वाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे आणि यांच्या यशानंतर आता लवकरच आश्रम ४ अर्थात सिरिजचा चौथा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिसऱ्या भागाच्या शेवटीच त्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.