कॅटरिनाची थोडी मस्ती.. थोडा प्यार; मालदीव व्हॅकेशनचे बोल्ड फोटो व्हायरल
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ- कौशलचा नुकताच ३९ वा वाढदिवस एकदम जोरात साजरा करण्यात आला. दरम्यान ती वाढदिवसाचे खास क्षण एन्जॉय करण्यासाठी निवांत क्षणी गेल्याचे दिसले. मुख्य म्हणजे सगळ्याच सेलिब्रिटींसाठी मालदीव हि जागा शांत आणि निवांत वेळ घालवण्यासाठी प्रचंड प्रसिद्ध आहे.
त्यामुळे कॅटरिना सुद्धा पती विकी कौशल सोबत आणि तिच्या खास मैत्रिणींसोबत तिचा वाढदिवस साजरा करताना दिसली. दरम्यानचे काही हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मिडीआयवर व्हायरल झाले माहीत.
दरम्यान कॅटरिनाचे हे कमाल फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये कॅटरिना अतिशय बोल्ड अंदाजात दिसते आहे. शिवाय या फोटोंमध्ये ती आणि तिच्या मैत्रिणी एकत्र बीचवर दिसत आहेत.
तसेच कॅटरिनाचा चेक्सचा मिडी ड्रेस सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. तिने शेअर केलेला हा फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करून बरेच दिवस उलटले आहेत. पण सोशल मीडियावर कॅटरिनाच्या अदा अजूनही कहर करत आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेले हे फोटो आणि व्हिडिओमध्ये कॅटरिना खूप आनंदी दिसतेय.
याशिवाय कॅटरिनाचा लग्नानंतर हा पहिलाच वाढदिवस असल्यामुळे तो फारच खास होता. चाळीशी येऊनही कॅटरिना अजूनसुद्धा कमालीची सुंदर दिसते. त्यामुळे कॅटरिनाचे खूप चाहते आहेत. या फोटोंवर २० लाखांहून अधिक लाईक्स आणि तुफान कमेंट्स आहेत.