Take a fresh look at your lifestyle.

आयुष शर्मा आणि सई मांजरेकर यांच्या ‘मांझा’ म्युझिक व्हिडिओचे मोशन पिक्चर रिलीज

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । सुपरस्टार सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माचा म्युझिक व्हिडिओ मांझाचा मोशन पिक्चर प्रसिद्ध झाला आहे. ज्यामध्ये आयुष शर्मा आणि सई मांजरेकर एकत्र पतंग उडवताना दिसत आहेत.
या मोशन पिक्चरमध्ये सई मांजरेकरने लाल रंगाचा कुर्ता आणि पांढरा सलवार घातलेला आहे तर आयुष शर्मा पांढर्‍या टी-शर्टवर हिरवा शर्ट आणि काळ्या रंगाचा पँट परिधान करताना दिसत आहेत.

 

या म्युझिक व्हिडीओमध्ये आयुष शर्माची बरोबर सई मांजरेकर दिसणार आहे. हे सुंदर गाणे १६ मार्च रोजी रिलीज होणार आहे.सई महेश मांजरेकर यांची मुलगी आहे आणि तिने सलमानच्या दबंग ३ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात केली आहे. प्रेक्षकांनाही तिचा अभिनय आवडला आहे. अधिकृत घोषणा झालेली नसली तरी सई एका मोठ्या साऊथच्या चित्रपटाचा भाग बनू शकते असे या क्षणी बोलले जात आहे.

त्याचवेळी आयुष शर्माबद्दल बोलताना तो सुपरस्टार सलमान खानसोबत’कभी ईद कभी दिवाली’ मध्ये स्क्रीन शेअर करतानाही दिसणार आहे. याशिवाय आयुष तामिळ चित्रपटाच्या ‘गूढ़ाचारी’चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे. तसेच ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये जाट गँगस्टरची भूमिका साकारतानाही तो दिसणार आहे.