Take a fresh look at your lifestyle.

गुड न्युज!! अक्षय कुमारचा सूर्यवंशी ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित ??

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | 2020 हे संपूर्ण वर्ष कोरोना काळात गेल्यानंतर त्याचा मोठा फटका बॉलीवूडला देखील बसला. लॉकडाउन दरम्यान देशभरातील चित्रपटगृह बंद होती. पण आता या वर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा(Akshay Kumar) सूर्यवंशी (Sooryavanshi) हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाची नवीन रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. मात्र, आता बातमी अशी आहे की, हा चित्रपट 2 एप्रिल 2021 रोजी प्रदर्शित होईल आणि थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार रोहित शेट्टी यांच्या दिग्दर्शनाखाली बनविलेला सूर्यवंशी गुड फ्राइडेला रिलीज होणार आहे. चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत. रिपोर्टनुसार, पुढील आठवड्यात चित्रपटाच्या रिलीजची तारीख घोषित केली जाईल.

सूर्यवंशी या चित्रपटात अक्षय कुमारसोबत कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अजय देवगन आणि रणवीर सिंहही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.