Take a fresh look at your lifestyle.

OMG 2 – ‘कर्ता करे न कर सके शिव करे सो होय; नवा लूक, नवी ऊर्जा अक्षयच्या लूकची सर्वत्र चर्चा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या अत्यंत बहुप्रतीक्षित सिनेमा OMG २ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याने सोशल मीडियावर या चित्रपटाशी संबंधीत पोस्ट शेअर करून चाहत्यांना याची माहिती दिली आहे. अक्षयने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले करीत कॅप्शनमध्ये ‘कर्ता करे न कर सके शिव करे सो होय..’ असे लिहिले आहे.

एकंदरच या चित्रपटात तो महादेवाच्या आधुनिक अवतारात दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्याने या पोस्टसोबत लिहिले आहे कि, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. OMG २, आम्ही तुमच्यासमोर एक महत्त्वाचा सामाजिक प्रश्न घेऊन येत आहोत. या प्रवासातून आदियोगींची शाश्वत ऊर्जा आपल्याला आशीर्वाद देवो. सर्वत्र शिव.’

दरम्यान या चित्रपटाचे शूटिंग रामघाट, उज्जैन येथे सुरू करण्यात आले आहे. माहितीनुसार, या चित्रपटाचे शूटिंग उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातदेखील होण्याची शक्यता आहे. सोबतच शूटिंगमध्ये अडचण नको म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. OMG २’मध्ये अक्षय कुमारसोबत, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. OMG २ या चित्रपटाचे शुटिंगचे वेळापत्रक उज्जैनमध्ये १७ दिवसांसाठी ठेवण्यात आले आहे तर पुढील शूटिंग इंदूरमध्ये होणार आहे. जवळपास ७ नोव्हेंबरपर्यंत उज्जैन आणि इंदूरमध्ये हे शूटिंग पूर्ण करून पुढील वेळापत्रक जाहीर केले जाईल.

OMG २ हा चित्रपट २०१२ साली रिलीज झालेल्या OMG चित्रपटाचा सिक्वेल आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात अक्षयसोबत परेश रावल मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट संपूर्णतः धार्मिक श्रद्धांवर आधारित होता. तर OMG २ या चित्रपटात जुनीच गोष्ट पुढे नेण्यात येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण शहरातील धार्मिक स्थळांवर करण्यात येणार आहे. या चित्रपटात चाहत्यांना निश्चितच काही नवीन पहायला आणि काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे. चाहते या चित्रपटाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. OMG या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केल्यानंतर आता याचा सिक्वल काय आणि किती बाजी मारणार हे पाहणे अत्यंत उत्कंठता वाढविणारे आहे. तूर्तास या चित्रपटाचे चित्रीकरण लवकर पूर्ण होऊन हा चित्रपट लवकर प्रदर्शित व्हावा इतकीच इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.