Take a fresh look at your lifestyle.

‘या’ कारणामुळे बॉलीवूडचे महानायक बारामतीमध्ये ; अजय देवगणही सोबतीला

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाइन | बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अजय देवगण यांचं शुक्रवारी (ता.१२) सकाळी अचानक बारामती विमानतळावर आगमन झालं. ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटण्यासाठी आल्याची चर्चा त्यामुळे परिसरात सुरु होती, मात्र ते आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी बारामतीत आले होते. आगामी मेडे या चित्रपटाच्या शूटिंग साठी बिग बी आणि अजय देवगण बारामती मध्ये आले आहेत. जवळपास सात वर्षांनंतर हे दोन एकत्र सिनेमा करत आहेत.

सकाळच्या सुमारास अमिताभ बच्चन तसेच अजय देवगण यांचं खासगी विमानानं बारामती विमानतळावर आगमन झालं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, बारामतीच्या नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे तसेच राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले, त्यानंतर अमिताभ यांनी आपला वेळ शुटिंगसाठी दिला.

दरम्यान, बारामती विमानतळ शहरापासून लांब असल्याने तिथे वर्दळ नसते, त्याने व्यत्यय येत नाही, या कारणामुळे या ठिकाणाची शुटिंगसाठी निवड करण्यात आली होती. अमिताभ बच्चन शुटिंग करुन परतल्यानंतर बारामतीत ते येऊन गेल्याची बातमी पसरली. काही ठिकाणी तर ते शरद पवार यांना भेटायला आल्याचीच कुजबूजही सुरु होती, मात्र त्यात काही तथ्य नव्हते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.