Take a fresh look at your lifestyle.

लालबागच्या राजाचा फोटो शेअर करून अमिताभ बच्चन यांनी दिल्या चाहत्यांना शुभेच्छा

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | गणेश चतुर्थी उत्सव आजपासून देशभरात सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती आपल्या भक्तांसोबत काही दिवस घरी राहतील. ज्या दिवशी बाप्पा आपल्या भक्तांच्या घरात राहतात, तिथे एक वेगळे वातावरण असते. परंतु कोरोना विषाणूमुळे, दरवर्षीप्रमाणे या वेळी सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही.गणेश चतुर्थी मुंबईत सर्वाधिक लोकप्रिय आहे. बॉलिवूड स्टार्ससुद्धा गणेश चतुर्थीबद्दल खूप उत्सुक असतात. दरम्यान, बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर गणेश चतुर्थीच्या खास प्रसंगी एक फोटो शेअर करून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

Ganapati Bappa Moreya ..🙏🙏🙏

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी गणेश चतुर्थीनिमित्त ‘बाप्पा’चे जुने चित्र शेअर करून चाहत्यांना या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लालबागच्या राजाच्या थ्रोबॅक पिक्चर्सचा कोलाज त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. हे पोस्ट शेअर करताना त्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ असे कॅप्शन दिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’