Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूड इंडस्ट्रीला आणखी एक धक्का; हार्ट अटॅकमूळे दिग्गज अभिनेता अमिताभ यांचे निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का पचवावा लागतोय. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेते अमिताभ दयाल यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने अर्थात हार्ट अटॅकमूळे निधन झाले. दरम्यान ते ५१ वर्षाचे होते. आज पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमिताभ हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांचा “कगार: लाइफ ऑन द एज” हा चित्रपट चांगलाच गाजला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या १३ दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. गेल्या १७ जानेवारीला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आणि दुसऱ्यांदा त्यांची चाचणी निगेटिव्ह आली. दरम्यान चालू उपचारांचा काहीही फायदा न झाल्याने अखेर अमिताभ यांनी आज जगाचा निरोप घेतला. दरम्यान त्यांची पत्नी, दिग्दर्शक मृणालिनी पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ दयाल यांचे काही नातेवाईक छत्तीसगडहून येणार आहेत. त्यानंतर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Dayal (@amitabhdayal)

मृत्यूआधी अमिताभ यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये अमिताभ यांनी कधीही पराभव पत्करायचा नाही असा संदेश आपल्या चाहत्यांना दिला होता. कधीही हार मानू नका..देव तुम्हाला चांगले काहीतरी देण्याची वाट पाहत आहे. लढत रहा.” असे त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते. अमिताभ दयाल यांनी ‘विरुद्ध’ आणि ‘कगार’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच त्यांची पत्नी मृणालिनी पाटील दिग्दर्शित धूम (2013), रंगदारी (2012), ये दिल्लगी (2013) यांसारख्या चित्रपटांमध्येही अव्वल भूमिका निभावल्या आहेत.