Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला पुन्हा कोरोनाची लागण; पालिकेने केली बिल्डिंग सील

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाने पुन्हा एकदा मुंबईत कहर माजवला आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट बघता बघता देशभर पसरल्याचे दिसून येत आहे. सध्या मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ४ असल्याचेही आरोग्य मंत्रांनी जाहीर केले आहे. हि बाब चिंताजनक असली तरीही बरे होणारे रुग्णही तितकेच असल्यामुळे भीतीदायक परिस्थिती तूर्तास तरी नाही. यानंतर आता कोरोनाने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये शिरकाव केला आहे. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय रिया कपूर, करण बुलानी, अंशुला कपूर यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे अर्जुन कपूरच्या राहत्या बिल्डिंगला पालिकेकडून सील करण्यात आले आहे.

 

माहितीनुसार, अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूर यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना क्वारंटाईन केले आहे. सूत्रानुसार, अर्जुन आणि अंशुला सावधगिरी बाळगत आहेत आणि त्यांना भेटलेल्या प्रत्येकाला चाचणी करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. शिवाय रिया कपूर आणि तिचा नवरा करण बूलानी यांचीही कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे ते दोघेदेखी क्वारंटाईन आहेत. याबाबतची माहिती रिया कपूरने इंस्टाग्रामद्वारे दिली आहे. अर्जुनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याची मैत्रीण मलायका अरोरा हिचीदेखील कोरोना चाचणी होणार आहे.

याआधी सप्टेंबर २०२०मध्ये अर्जुन कपूरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यातून तो बरा झाला होता. यानंतर आज दुसऱ्यांदा त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तूर्तास पालिकेकडून तो राहत असलेली बिल्डिंग सील केली आहे. गेल्या २ वर्षात कोरोनामूळे अनेक सेलिब्रिटींनी चाहत्यांचा निरोप घेतला. तर अनेक सेलिब्रिटींनी कोरोनावर मात केली. यात अमिताभ बच्चन, अभिषेक, ऐश्वर्या, आराध्या असे संपूर्ण बच्चन कुटुंब तर यासह पूरब कोहली, जेनेलिया देशमुख, आमिर खान, कॅटरीना कैफ, सोनू सूद, रणबीर कपूर, आलिया भट अश्या नेक बड्या सेलिब्रिटींनी कोरोनावर मात केली आहे.