Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता अर्जुन कपूरची कोरोनावर मात ; लोकांना केलं ‘हे’ आवाहन

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरने कोरोनावर मात केली आहे. तब्बल ३० दिवसांनी त्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. अर्जुनने सोशल मीडियावर पोस्ट करून याबद्दल माहिती दिली आहे. अर्जुनच्या या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांना दिलासा मिळाला असून चाहत्यांनी कमेंट करून त्याला आराम करण्याची विनंती केली आहे. 

अर्जुन कपूरने चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये आपला कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं तो म्हणतो. मला आता बरं वाटतं आहे. हा व्हायरस गंभीर आहे, त्यामुळे मी सुद्धा सर्वांना विनंती करतो की, तुम्हीही या रोगाला गंभीरपणे घ्या. कोरोनाचा प्रभाव ज्येष्ठ नागरिकांवर आणि लहानांवर दोघांवरही होतो. त्यामुळे आपली काळजी घ्या आणि मास्कचा वापर करा.  

View this post on Instagram

🙏

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

अर्जुन म्हणाला ,”मला तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की माझी करोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. मला आता बरे वाटते आणि पुन्हा शुटींग सुरु करण्यासाठी मी उत्सुक आहे. तुम्ही दिलेल्या सकारात्मक शुभेच्छांसाठी तुमचे खूप खूप आभार. हा व्हायरस खूप भयानक आहे त्यामुळे सगळ्यांनी कृपया काळजी घ्या”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.