Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवुड अभिनेता हृतिक रोशनच्या घरी आला इटुकला पिटुकला मोगली

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| काल म्हणजेच १० जानेवारी रोजी बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता हृतिक रोशन याचा ४८ वा वाढदिवस झाला. जगभरातून हृतिकवर शुभेच्छा आणि आशीर्वादाचा पाऊस अगदी धो धो पडला. सोशल मीडियावर तर हॅशटॅग हॅप्पी बर्थडे हृतिक रोशन आणि हॅप्पी बर्थडे डूग्गू इतकच पाहायला मिळतं होतं. हृतिक रोशनलाच प्रेमाने डूग्गू या नावाने ओळखले जाते. सगळीकडे हृतिकच्या बर्थ डे च सेलिब्रेशन जोरात सुरू होत. पण हृतिकचा बर्थडे खास झाला तो फक्त आणि फक्त मोगली मुळे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

आता हा मोगली म्हणजे कोण? तर मोगली म्हणजे हृतिक रोशनच्या घरी आलेला नवा पाहूणा. हा नवा पाहुणा कुणी माणूस नव्हे बरं. तर हा पाहुणा आहे कुत्र्याचं छोटंसं पिल्लू. हे छोटंसं पिल्लू हृतिकने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी दत्तक घेतल आहे. होय. दत्तक. हृतिकच्या आयुष्यात हा नवा पाहुणा नवी आशा आणि आनंद घेऊन आला आहे. त्याने इंस्टाग्रामच्या माध्यमातुन आपला आनंद आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

 

कभी खुशी कभी गम, कोई मिल गया, धूम 2, मुझसे दोस्ती करोगे, वॉर, क्रिश आणि सुपर ३० या चित्रपटांमधून त्याने आपल्या अभिनयाची एक वेगळीच सीमा दर्शविली आहे. तर जोधा अकबर, मोहेंजोदडो यासारख्या ऐतिहासिक कथानकाचा पाया असणाऱ्या चित्रपटांमध्ये ह्रतिकने अव्वल कामगिरी करीत प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली आहे. हृतिकने त्याच्या आयुष्यातील सर्वात पहिला अवॉर्ड त्याच्या सर्वात पहिल्या चित्रपटासाठी चित्रपट सृष्टीतील पदार्पण आणि उत्तम अभिनय यासाठी पटकावला होता. यानंतर २०११ साली त्याने टेलिव्हिजन डान्स रिॲलिटी शो जस्ट डान्स हा परीक्षक म्हणून गाजवला होता.