Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने केली नव्या चित्रपटाची घोषणा; मराठी दिग्दर्शकासोबत करणार काम

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता कार्तिक आर्यन गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. कधी चित्रपटांसाठी तर कधी निर्मात्यांसोबत झालेल्या वाद विवादांसाठी. काही दिवसांपूर्वीच कार्तिक धर्म प्रोडक्शन च्या कारण जोहरला नडला होता. परिणामी त्याला दोस्ताना २ या चित्रपटातून थेट बाहेरचा रास्ता दाखविण्यात आला. मात्र त्यानंतर कार्तिक थांबला नाही. त्याने नुकतीच दुसऱ्या चित्रपटाची घोषणा केली आहे. इतकेच नव्हे तर तो चक्क मराठी दिग्दर्शक समीर विद्वांस यांसोबत काम करणार आहे. समीर या चित्रपटातून बॉलिवूड जगतात पदार्पण करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार कार्तिक आर्यन एका प्रेमकथेवर आधारीत चित्रपटात दिसणार आहे. ‘पिंकविला’ ने दिलेल्या वृत्तानुसार साजिद नादियावाला या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तर कार्तिक पहिल्यांदाच साजिद सोबत काम करणार आहे. तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते मराठी दिग्दर्शक समीर विद्वांस या चित्रपटांचे दिग्दर्शन करणार असल्याचं समोर येत आहे. या चित्रपटातून समीर बॉलिवूड मध्ये पदार्पण करत आहेत. हा त्यांचा पहिलाच हिंदी चित्रपट असणार आहे. याआधी त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत ‘आनंदी गोपाळ’, ‘धुरळा’, ‘डबल सीट’, ‘व्हाय झेड’ यांसारखे एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

अद्याप या चित्रपटाचे नाव ही निश्चित झालेले नसून तो प्री प्रॉडक्शन स्टेजमध्ये आहे. जर सर्व योग्य योग्य वेळी जुळून आले तर लवकरच या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होऊ शकते. चित्रपटाची ‘नादियावाला ग्रँडसन’ आणि ‘नम्हा पिक्चर्स’ मिळून निर्मिती करणार आहेत. कार्तिक या नव्या चित्रपटासह ‘धमाका’ आणि ‘भुलभूलय्या २’ या आगामी चित्रपटांतही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. धमाका चित्रटात तो अमृता सुभाष, मृणाल ठाकूर यांच्यासोबत काम करणार आगहे. तर भुलभूलय्या २ या चित्रपटात तो कियारा अडवानी आणि तबूसोबत दिसणार आहे.