हॅपी बर्थडे कुणाल खेमू; अशी जमली सोहा – कुणालची जोडी
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमु ह्याने फार असे चित्रपट भले दिले नसतील. पण आपल्या कॉमेडी अंदाजामुळे तो नेहमीच ओळखला जातो. त्याने अनेक कॉमेडी चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र त्याने त्याच्या कारकीर्दीत सुरुवातीच्या काळात गंभीर भूमिकाही साकारल्या आहेत. अश्या ह्या बहुरंगी नटाचा आज ३८ वा वाढदिवस आहे. तसे त्याच्या अभिनय कारकिर्दीबाबत सारेच जाणतात पण लव्ह लाईफ बद्दल जाणणारे कमीच. त्यामुळे त्याच्या वाढदिवसा निमित्त त्याची आणि सोहा आली खान यांची जोडी कशी जमली ते जाणून घेऊया.
कुणाल आणि सोहा ‘ढूँडते रह जाओगे’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान पहिल्यांदा भेटले होते. मात्र त्यावेळी या दोघांमध्ये फारस बोलणंही होत नसे. दरम्यान ते फक्त आपल्या चित्रिकरणावर लक्ष देत होते. त्यानंतर त्यांची पुन्हा भेट ‘९९’ या चित्रपटाच्या सेटवर पुन्हा एकदा झाली. त्यावेळी पहिल्यांदा सोहाला कुणालबद्दल तरी अनामिक ओढ वाटली. कुणालला वाटल होतं की, सोहाने ऑक्सफर्डमधून पदवी प्राप्त केली आहे आणि ती या क्षेत्रात काय करतेय. यावरून त्यांच्यात संवाद सुरु झाला. हळूहळू दोघांनाही एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागले आणि यातूनच त्यांना प्रेमाची जाणीव झाली. पुढे कुणालने एकदम खास आणि फिल्मी अंदाजात सोहाला प्रपोज केलं होतं.
मुख्य आणि मजेशीर बाब अशी की सोहाला स्वयंपाक अजिबात करता येत नाही. सोहा कधी किचनमध्ये फिरकली सुद्धा नव्हती. त्यात मज्जा म्हणजे कुणालला उत्तम स्वयंपाक करता येतो. आता मूळ गोष्टीकडे वळूया.
लग्नापूर्वी सोहाने कुणालवर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी स्वतः स्वयंपाक करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. मात्र तिने पूर्ण स्वयंपाक करपवून टाकला होता. तरीसुद्धा कुणालने ते अगदी प्रेमाने नावं न ठेवता फस्त केलं होतं. पुढे त्यांनी मिळून सोहाच्या आईला लग्नासाठी मनवले. त्यानंतर २०१५ मध्ये हे दोघे लग्नबंधनात अडकले. आता यांना इनाया ही २ वर्षांची मुलगीसुद्धा आहे.