हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा एक असा कलाकार आहे ज्याने कोणाच्याही पाठिंब्याशिवाय केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचा असा वेगळा प्रेक्षक वर्ग बनविला आहे. बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या भूमिकांमधून मनोरंजन करण्यासाठी उत्सुक असतो. केवळ बॉलिवूडचं नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही नवाजुद्दीनने आपले स्थान निर्माण केले आहे. ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजमध्ये त्याने साकारलेली गणेश गायतोंडे हि भूमिका इतकी गाजली कि नवाजुद्दीन काही दिवसातच सुपरस्टार झाला. अशात नवाजला ओटीटीवर पाहायला त्याचे चाहते नेहमीच आसुसलेले असतात. पण कदाचित यापुढे हे शक्य नाही. होय. कारण भविष्यात आता कोणताही ओटीटी शो न करण्याचा निर्णय नवाजुद्दीनने घेतला आहे आणि त्यामागचं कारणही त्याने माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी ने छोड़ा डिजीटल वर्ल्ड, अब नहीं करेंगे वेब शोज, कहा- “ओटीटी प्लेटफ़ॉर्म अब डंपिग ग्राउंड बन गए हैं”#NawazuddinSiddiqui
LINK: https://t.co/42U81CCvdM pic.twitter.com/9wgMrmB1AK— BollyHungama (@Bollyhungama) October 29, 2021
‘बॉलिवूड हंगामा’ या डिजिटल माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने डीजिटल प्लॅटफॉर्मवरच्या कन्टेन्टवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान नवाजुद्दीन म्हणाला कि, डिजिटल प्लॅटफॉर्म आता केवळ फालतू आणि निकृष्ट दर्जाचा कन्टेन्ट देऊ लागले आहेत. जणू ओटीटी प्लॅटफॉर्म डंपिंग ग्राऊंड बनली आहे. सध्या यावर कोणतेच चांगले शो नाहीत. जुन्याच शोचे नवे नवे सीक्वल बनवून ते सादर केले जात आहेत. यात नवं बघण्यासारखं असं काहीही नाही आहे, असे म्हणत नवाजुद्दीनने आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुढे म्हणाला, नेटफ्लिक्ससाठी मी सेक्रेड गेम्स ही वेबसीरिज केली तेव्हा मी खूपच उत्साहित होतो. त्यावेळी डिजिटल मीडियम एक आव्हान म्हणून मी स्वीकारलं होतं. इथे नव्या टॅलेंटला एक विशेष संधी मिळतं होती. पण आता तो फ्रेशनेसच यातून गायब झाला आहे. मोठ मोठे प्रॉडक्शन हाऊस आणि ओटीटीचे सुपरस्टार म्हटले जाणारे काही सो – कॉल्ड कलाकारांसाठी हा प्लॅटफॉर्म आता एक धंदा बनला आहे. मोठ्या निर्मात्यांना अधिकाधिक कन्टेन्ट बनवण्यासाठी भरभक्कम पैसे मिळत आहेत आणि यामुळे कामाची क्वालिटी संपली आहे. परिणामी यामुळे आता ओटीटी शो झेलणं कठीण झालं आहे. त्यामुळे मी आता अशा बेकार शोचा भाग बनू इच्छित नाही.
वर्क फ्रन्टबद्दल बोलायचे तर, नुकताच ६७ व्य फिल्म फेअर अवॉर्ड्मध्ये नवाझुद्दीन यांना गौरविण्यात आले. शिवाय लवकरच नवाझुद्दीन एका सस्पेन्स कथानकाच्या ‘अद्भुत’ या चित्रपटातून नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसेल.
Discussion about this post