Take a fresh look at your lifestyle.

..म्हणून दिपिका तिच्या कपाटाला कुलुप लावते; रणवीरचा नवा लूक ठरला थट्टेचा विषय

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या फॅशन सेन्सबद्दल तर काय बोलणार. तो कधी कोणतं कापड नवी फॅशन म्हणून वापरेल हे सांगणं अगदीच कठीण आहे. त्याच्यासाठी त्याचा फॅशन सेन्स त्याची स्टाईल नेहमीच कशी एकदम युनिक आणि हटके असते. पण त्याचे नवे नवे कपडे पाहून नेटकरी मात्र खदाखदा हसतात. याहीवेळी अश्याच एका युनिक स्टाईलच्या नादात रणवीर थट्टेचा विषय झाला आहे. याआधीही तो बऱ्याचदा त्याचा फॅशनमुळे ट्रोल झाला आहे आणि त्यामुळे यावेळीही त्याचा लूक पाहून पुन्हा एकदा नेटकरी त्याच्या मागे हात धुवून लागले आहेत. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.

अलीकडेच त्याचा एक आगळावेगळा लुक समोर आला होता. ज्यात त्याने भरगच्च दागिने परिधान केले होते. रणवीरच्या या लुक ची फारच चर्चा झाली होती. त्यानंतर आता लगेच त्याचा हा लूक चांगलाच वायरल होतोय. मरून रंगाची पॅन्ट परिधान करत त्यावर आकाशी रंगाचा शर्ट त्याने घातला असल्याचे आपण या फोटोत पाहू शकता. रणवीरच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

कुणी त्याची टर उडविली आहे तर कुणी त्याच्या बिंधास्तपणाचे कौतुक केले आहे. एका नेटकाऱ्याने म्हटले आहे कि, दीपिकाची पॅन्ट पुन्हा घातलीस का काय? तर अन्य एका युजरने फेसबुकवर हा फोटो पोस्ट करत म्हटले आहे कि, जेव्हा घरातील सर्व सोफ्यांना कव्हर शिवूनही थोडं कापड शिल्लक असते. यावर आणखी एक युजर म्हणतोय कि, त्याने दीपिकाचा खालचा सलवार घातलेला दिसतोय. म्हणून दिपिका नेहमी तिच्या कपाटाला कुलुप लावते… असेही काहींनी म्हटले आहे.

 

अश्या प्रकारे एकंदर पुन्हा एकदा रणवीर त्याच्या फॅशनमुळे थट्टेचा विषय झाला आहे. याआधीही रणवीरने अनेकदा असे कपडे परिधान केले आहेत ज्यामुळे नेटकऱ्यांचे लक्ष साहजिकच वेधले जाते. विशेष म्हणजे, हा फोटो पँराझींनी क्लीक करतेवेळी अभिनेता रणवीर सिंग हा दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिस बाहेर दिसला होता. त्यामुळे संजयलीला भन्साली आणि रणवीर यांच्यामध्ये नेमकं काय शिजतंय याबाबत इंडस्ट्रीमध्ये चर्चा केल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर आता हे दोघे पुन्हा एकत्र येऊन नवा मसाला चित्रपट घेऊन येणार का काय? अश्या शक्यता देखील वर्तविला जात आहेत. याशिवाय रणवीर करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या दोन चित्रपटांत दिसणार आहे. तर ’83’ हा त्याचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.