Take a fresh look at your lifestyle.

अलौकिक देसाईंच्या ‘सीता’ चित्रपटातील रावणाच्या भूमिकेसाठी रणवीर सिंगची तयारी सुरु

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलौकिक देसाईंनी अलीकडेच ‘सीता’ या आपल्या महत्वाकांक्षी प्रोजेक्‍टची घोषणा केली आहे. यामध्ये सीतेच्या दृष्टीकोनातून रामायणाची कथा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कल्पनेच्या विश्वातील परिसीमा गाठत सादर केली जाणार आहे. या सिनेमातील सीतेच्या रोलसाठी बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर किंवा आलिया भट यांच्या नावाचा विचार केला जात आहे, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र या चित्रपटातील रावणाची भूमिका हि अत्यंत आव्हानात्मक भूमिका असणार आहे. हि भूमिका साकारण्यासाठी अभिनेता रणवीर सिंग याची जोरो शोरोसे तयारी सुरु झाली आहे. अद्याप अशी अधिकृत घोषणा केलेली नाही कि रावणाची भूमिका रणवीर सिंग साकारेल.

 

सीता या चित्रपटाविषयी अद्याप अधिकांशी काहीच माहिती प्राप्त झालेली नाही. मात्र त्यातील बाकीचा तपशील निश्‍चित होण्यापूर्वीच रणवीर सिंगने या चित्रपटात रावणाची आव्हानात्मक मात्र अत्यंत महत्वाची अशी भूमिका करण्याची पूर्ण तयारी दर्शवली आहे. हा चित्रपट मोठ्या बजेटसह तयार केला जाणार आहे. याचे प्रॉडक्‍शन ‘बाहुबली’ या सगळ्यात बिग बजेट चित्रपटाइतकेच मोठे असण्याची दाट शक्यता आहे, असे काही निकटवर्तीयांनी सांगितले. ‘सीता’ हा चित्रपट सीता मातेच्या जीवनाचे भाष्य करणारा तसेच पवित्र रामायणाचा अंश असणारा अलौकिक चित्रपट असणार आहे. या चित्रपटासाठी अलौकिक देसाई अत्यंत कष्ट घेत असल्याचे सूत्रांकडून समजत आहे.

 

या चित्रपटातील मुख्य भूमिका सीता या पात्रासाठी जर करीनाची निवड झाली आणि सोबतच रावणाच्या भूमिकेसाठी रणवीरच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाली तर त्यांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट खास पर्वणी ठरणार आहे. जर या दोघांची निवड पक्की झाली तर रणवीर आणि करीना प्रथमच एका चित्रपटामध्ये सोबत दिसण्याची शक्‍यता आहे.

‘राम लिला’ या चित्रपटात ते दोघे एकत्र काम करणार, असे प्राथमिक नियोजन होते. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. रामायणावर आधारित या चित्रपटात व्हीएफएक्‍सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाणार आहे. या रावणाच्या रोल व्यतिरिक्‍त बहुचर्चित ‘८३’ मध्ये रणवीर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय तो ‘सर्कस’ आणि ‘जयेशभाई जोरदार’ मध्येही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.