Take a fresh look at your lifestyle.

औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर भडकला रितेश देशमुख; म्हणाला, भर रस्त्यात चोपला पाहिजे’

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण जगभरात कोरोना विष्णूने थैमान घातला आहे. तर राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून हि लाट आधीहून अधिक भयंकर अक्राळ विक्राळ रूप धारण करून आली आहे. यात रोज लाखो नवे रूग्ण सापडत आहेत. ऑक्सिजन, आयसीयू बेड्सअभावी रूग्णांना अक्षरशः जीव गमवावा लागतोय. मात्र अश्या परिस्थितीत कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा सर्रास काळाबाजार सुरु आहे. हे पाहून अभिनेता रितेश देशमुख चांगलाच संतापला आहे.दरम्यान या लोकांना ‘भर रस्त्यात चोपला पाहिजे’, म्हणत त्याने आपला संताप व्यक्त केला आहे.

रितेश देशमूख सध्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. देशातील विविध मुद्द्यांवर तो नेहमीच आपल्या परीने भाष्य करीत असतो. आजूबाजूला घडत असलेल्या मुद्द्यांवर आणि सद्य परिस्थितीवर तो आपल्या प्रतिक्रिया जाणीवपूर्वक मांडताना दिसतो. आता त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट रिट्वीट केले आहे. ‘औषधांचा काळाबाजार करणार्‍यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे’, असे ट्वीट रितेशने केले आहे. नागपुरमध्ये एका कोरोना रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शनऐवजी ऍसिडिटीचे इंजेक्शन देण्यात आले होते. हे पाहून रितेश देशमुख चांगलाच संतापला आणि त्याने ट्विट करत आपल्या संपात व्यक्त केला.

अभिनेता रितेश देशमुख हा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या प्रेक्षकांच्या संपर्कात असतो. नेहमीच विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत तो आपल्या चाहत्यानाचे मनोरंजन करीत असतो. नुकताच त्याचा कोळी आगरी गाण्यावरील परफॉर्मन्स चाहत्यांना चांगलाच भावला होता. अगदी सध्या सुध्या पारंपरिक वेशात आणि चेहऱ्यावरील हावभाव यांच्या आधारावर त्याने हा व्हिडीओ बनवून इंस्टाग्राम वर शेअर केला होता. हा व्हिडीओ प्रचंड वायरल झाला असून चाहते अजूनही हा व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत.