Take a fresh look at your lifestyle.

सैफ पुन्हा होणार खलनायक ; ‘या’ चित्रपटात साकारणार रावणाची भूमिका

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | अभिनेता सैफ अली खान पुन्हा एकदा खलनायकाची भूमिकेत दिसणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटात सैफ खलनायकाच्या रुपात दिसणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित केलेल्या आदीपुरुष चित्रपटात सैफ रावणाची भूमिका साकाणार आहे.

सैफने यापूर्वी ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता ‘आदिपुरुष’मध्ये देखील तो खलनायकाच्या रुपात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ आणि ओम राऊत पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत.

काही दिवसांपूर्वी ओम राऊत यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचं एक पोस्टर शेअर करत चित्रपटाची घोषणा केली होती.दरम्यान, हा चित्रपट 3D अॅक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा असून भूषण कुमार याची निर्मिती करत आहेत. २०२२ मध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’