Take a fresh look at your lifestyle.

सैफ अली खान लिहितोय आत्मचरित्र ; पुढच्या वर्षी होईल प्रदर्शित

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | सैफ अली खान यांनी त्यांचे आत्मचरित्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. या पुस्तकात सैफ आपल्या आयुष्यातील उतार-चढ़ाव, कुटुंब, यश आणि अपयश, त्याच्या प्रेरणा आणि चित्रपटांबद्दल लिहिणार आहे. वृत्तानुसार हार्पर-कॉलिन्स सैफचे आत्मचरित्र प्रकाशित करणार असून हे पुस्तक 2021 मध्ये प्रसिद्ध होईल.

सैफच्या या आत्मचरित्रातून चाहत्यांना त्याच्या आयुष्यातील असेकाही किस्सेही माहिती मिळतील ज्या आतापर्यंत सर्वांना ठाऊक नाहीत.

अलीकडेच एक बातमी आली होती की सैफ ‘आदिपुरुष’ चित्रपटात रावणच्या भूमिकेत दिसू शकतो. या चित्रपटामध्ये रामायणचादेखील भाग असणार असल्याचे बोलले जात आहे. वृत्तानुसार, रावणची भूमिका साकारण्यासाठी सैफ अली खानला संपर्क साधण्यात आला आहे. यापूर्वी सैफ अलीने तान्हाजीमध्येही खलनायकाची भूमिका केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना सैफचे काम खूप आवडले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’