Take a fresh look at your lifestyle.

प्रभासच्या ‘आदिपुरुष’ मध्ये सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत ???

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने नुकताच त्याच्या आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’ चे पोस्टर प्रदर्शित केले होते.हा चित्रपट 2022 मध्ये हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

2020 मध्ये रिलीज झालेल्या ‘तन्हाजी – द अनसंग वॉरियर’ हा सुपरहिट चित्रपट बनविणारा ओम राऊत हे चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. आदिपुरुषाचा लोगो प्रसिद्ध झाला असून तो एका पौराणिक चित्रपटासारखा दिसत आहे. त्यात रामायणचादेखील भाग असणार असल्याचे वृत्त आहे. आणि रामायणात रावणाचा उल्लेख नाही असेही होऊ शकत नाही.

अस ऐकण्यात येत आहे की रावणची भूमिका साकारण्यासाठी सैफ अली खानकडे संपर्क साधण्यात आला आहे. तसे, तान्हाजीमध्ये सैफ अलीनेही खलनायकाची भूमिका केली होती आणि ओमला त्याचे काम खूप आवडले, कदाचित म्हणूनच तो त्याला पुन्हा पुन्हा सांगत आहे. परंतु अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

हिरोईनच्या बाबतीत बोलायचे झाले तर दीपिका पादुकोणचे नाव समोर येत आहे. आदिपुरुष हिंदी आणि तेलगूमध्ये बनवले जाईल आणि तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेतही डब होईल. थ्रीडी इफेक्टमध्ये बनवलेल्या या चित्रपटाचे बजेट कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’