Take a fresh look at your lifestyle.

… मला आनंद आहे; RRR’ च्या यशावर बॉलिवूडच्या भाईजानने दिली प्रतिक्रिया

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एस. एस. राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपट तर एकदम हिट झाला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अगदी आठवड्यातच करोडोंचा गल्ला जमवला आहे. या सिनेमाची भारतातील कमाई ९१.५० कोटी इतकी झाली आहे. तर RRR या चित्रपटाचे शो अजूनही हाऊसफुल्ल जात आहेत. हे पाहून सर्व स्तरांवरून या चित्रपटावर, चित्रपटाच्या कथानकावर आणि चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकेवर भरभरून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. यानंतर आता बॉलिवूड सिनेसृष्टीतील भाईजान म्हणजेच सलमान खान याने चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आरआरआर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमालीची कामे करताना दिसतोय. आतापर्यंत या चित्रपटाने करोडोंचा गल्ला जमवला आहे. दरम्यान या चित्रपटाबाबत बॉलिवूड अभिनेता सलमान खानने आपली प्रतिक्रिया दिली आहे. सलमान खान म्हणाला कि, “मी चिरंजीवी यांच्यासोबत काम केलं आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. त्यांचा मुलगा रामचरण हा माझा मित्र आहे. रामचरणने RRR सिनेमात खूप दमदार काम केलं आहे. या सिनेमाला एवढं यश मिळतंय, याचा मला आनंद आहे.”

या चित्रपटाचे कथानक अशा दोन व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्याचे भाष्य करते जो आपल्या इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे. भारताचा तो काळ, जेव्हा भारत पराधीनतेच्या बेड्यांमध्ये जखडला होता, तेव्हा स्वातंत्र्यलढा वेगवेगळ्या पातळ्यांवर लढला जात होता. राजामौली यांनी त्या काळातील पानांवर एका काल्पनिक स्वातंत्र्याची कथा तयार केली आहे. या कथेचे दोन नायक आहेत ज्यांना दिग्दर्शकाने आग आणि पाणी म्हणून दाखवले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

आग म्हणजे राम (राम चरण) जो एक ब्रिटिश पोलिस आहे. हा पोलिस कर्मचारी आपल्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून हजारोंच्या गर्दीत एकटाच प्रवेश करतो. दुसरा पाणी म्हणजे भीम (ज्युनियर एनटीआर) जो सरळ, शांत आणि स्वतःच्या जगात आनंदी आहे. भीम गोंड जातीचा आहे, जे लोक अतिशय शांतीप्रिय आहेत आणि कळपात राहतात. या दोघांच्या संघर्षाची RRR हि कथा आहे .