Take a fresh look at your lifestyle.

भाईजान सलमान खान घालवतोय भाचीसोबत वेळ ; व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूडचा भाईजान सलमान खान नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. सलमान खानचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात आहेत. दरम्यान नुकताच सलमानने सोशल मीडियावर आपल्या भाची सोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ सलमानची बहीण अर्पिता खान शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. सलमानने तोच व्हिडीओ रिपोस्ट केला आहे. या व्हिडीओत सलमान भाची आयत सोबत दिसत आहे. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘तू जो मिला’ हे गाण सुरू आहे. या व्हिडीओ २० लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

दरम्यान, सलमानने त्याचा आगामी चित्रपट ‘राधे’चं चित्रीकरण पूर्ण केलं आहे तसेच आगामी ‘अंतिम’ या त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरणसुद्धा करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मंहेश मांजरेकर करत आहेत. हा चित्रपट मराठी चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा रिमेक असून ऑगस्ट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.