Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता संजय दत्तची कॅन्सरवर यशस्वी मात

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूड साठी आणि बॉलीवूड चाहत्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. गेले काही दिवस कर्करोगाने त्रस्त झालेल्या बॉलिवूडचा ‘संजू बाबा’ अर्थात संजय दत्त (Sanjay Dutt) यांने फुप्फुसाच्या कर्करोगावर यशस्वी मात केली आहे. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिती त्याने सगळ्यांचे आभार मानले आहेत. ‘केवळ माझे कुटुंबिय, डॉक्टर आणि तुमच्या सर्वांच्या आशिर्वादामुळे ही शक्य झाले आहे’, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. काहीच दिवसांपूर्वी संजय दत्तचे फोटो व्हायरल झाले होते. यात त्याची प्रकृती ढासळलेली दिसल्याने चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र, आता संजय दत्तने स्वतः हे आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली आहे.

‘गेले काही आठवडे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अतिशय कठीण होते. पण, म्हणतात ना की देव सगळ्यांना मजबूत करण्यासाठी अशा खडतर प्रसंगांचा सामना करायला लावतो. आज, माझ्या मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी जाहीर करत आहे की, मी या आजारावर पूर्णपणे मात केली आहे. माझ्या कुटुंबासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. तुम्हा सगळ्यांच्या आशिर्वाद आणि प्रार्थनांनशिवाय ही शक्य झाले नसते. या कठीण काळात मला साथ देणारे माझे कुटुंब, मित्र परिवार आणि सगळ्या चाहत्यांचा मी आभारी आहे.कोकिलाबेन रुग्णालयातील सगळे डॉक्टर, नर्स आणि इतर स्टाफने माझी खूप काळजी घेतली. सगळ्यांचे मनःपूर्वक आभार’, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

संजय दत्त चौथ्या टप्प्यातील कर्करोगाने ग्रस्त होता आणि त्याच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. तथापि, त्याने किंवा त्याच्या कुटुंबियांनी याची पुष्टी केली नाही. संजूच्या आजाराची बातमी माध्यमांपर्यंत आल्यानंतर त्यांची पत्नी मान्यता यांनी लोकांना अफवांकडे लक्ष न देण्याचे आवाहन केले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’