हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | प्रियंका चोप्रा निर्मित ‘व्हेंटिलेटर’ सिनेमातील अभिनेता संजीव शाह यांचं निधन झालं आहे. संजीव शाह 60 वर्षाचे होते.त्यांनी व्हेंटिलेटर सिनेमात दादाची भूमिका साकारलेल्या होती.तसेच जराती नाटकांत अभिनेता आणि सिनेनिर्माते म्हणून संजीव शाह कार्यरत होते.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजीव यांचे गेल्या कित्येक दिवसांपासून ब्रेन स्ट्रोक झाले होते. तसेच त्यांना फुफ्फुसाचा देखील त्रास होता. संजीव हे उत्तम मराठी बोलत होते. त्यांनी व्हेंटिलेटर सिनेमात साकारलेली भूमिका चर्चेत आली होती. तसेच ‘राऊंड टेबल इंडिया’ या मार्फत सामाजिक कार्यात सहभागी होते.
वयाच्या ६० व्या वर्षी संजीव यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेकांसाठी ही धक्कादायक बाब आहे. दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी देखील सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’