Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूड किंग खानची लेक झाली २१ वर्षाची; गौरी खानने इंस्टावर केले बर्थडे विश

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान आज २१ वर्षाची झाली आहे. अद्याप सुहानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी तिचे फॅन फॉलोव्हिंग जबरदस्त आहे. सुहाना सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. आज सुहानाचा २१वा वाढदिवस आहे. यानिमित्त तिची आई अर्थात गौरी खान हिने सोशल मीडियावर सुहानाचा एक अत्यंत सुंदर फोटो शेअर केला आहे. यासोबतच तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या फोटोवर अनेक जण तिला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देत आहेत.

गौरी खानने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिची लेक सुहाना एका खुर्चीवर बसलेली दिसतेय. यात तिने पोलका डॉट स्टाईलचा ड्रेस परिधान केला आहे. हा फोटो शेअर करताना गौरी खानने लिहिले की, तुझ्यावर आज..उद्या आणि कायमच प्रेम राहील. तर गौरीच्या या पोस्टवर सुहानाने देखील आय लव्ह यू अशी कमेंट केलीय.

गौरीच्या या पोस्टवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी कमेंट करत सुहानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री नीलम कोठारीने या पोस्टवर कमेंट करत लिहिले आहे कि, “हॅपीएस्ट बर्थडे डार्लिंग सुहाना”. तर नीलमसोबत सीमा खान, भावना पांडे, संजय कपूर अशा अनेक सेलिब्रिटींनी बेबी सुहानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सध्या सुहाना खान न्यू यॉर्कमध्ये फिल्म मेकिंग आणि अभिनयाचे धडे गिरवित आहे. शाहरुखची लेक सुहाना हि फेमस स्टारकिड्सपैकी एक आहे. सोशल मीडियावर तिचे लाखोंच्या पटीत फॅन फॉलोईंग आहे. सुहाना खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा रंगली आहे. २०१८ साली तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते. मध्यंतरी संजय लीला भन्साळी सुहानाला नव्या चित्रपटात लॉन्च करणार आहेत, अश्या बातमीने जोर धरला होता. कुण्या मोठ्या दिग्दर्शकाने सुहानाला लॉन्च करावे, अशी शाहरूखची इच्छा आहे. त्यामुळे हे पाहणे अगदीच उत्सुकतेचे आहे कि, सुहाना बॉलिवूडमध्ये कुणाचे बोट धरून येणार…