Take a fresh look at your lifestyle.

फायर है भाई तू…! श्रेयस तळपदेच्या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। साऊथचा स्टायलिश सुपरस्टार अल्लू अर्जुनची लोकप्रियता खतरनाक आहे. त्यामुळे त्याचा कोणताही चित्रपट हलके में लेने का नहीं। अलीकडेच रिलीज झालेल्या त्याच्या ‘पुष्पा- द राईज’ या चित्रपटाने तर कहर केलाय. खतरनाक कथानक, कमाल डायलॉगबाजी आणि हिंदी डबसाठी श्रेयस तळपदेने दिलेला आवाज. बस्स आणखी काय पाहिजे? या चित्रपटाने हिंदीमध्ये इतकी लोकप्रियता मिळवली आहे कि सगळीकडे फक्त आणि फक्त पुष्पा चित्रपटाचं क्रेझ दिसून येत आहे. त्यात श्रेयसची स्वतःची विशेष लोकप्रियता असल्यामुळे आणखीच रंगत आली. त्यात श्रेयसचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय आणि यावर चाहते एकापेक्षा एक कमेंट करीत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

श्रेयसच्या व्हायरल व्हिडिओमागे ‘ए बिड्डा ये मेरा अड्डा’ हे गाणे सुरु आहे. या व्हिडिओमध्ये श्रेयस काम करीत असलेल्या माझी तुझी रेशीमगाठ या सेटवरील काही शॉट्स आहेत. इतकेच काय तर मालिकेत त्याचा मित्र म्हणून काम करणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे देखील या व्हिडीओध्ये दिसतोय. हा व्हिडीओ पाहून श्रेयसच्या चाहत्यांनी यावर एका पेक्षा एक भारी कमेंट केल्या आहेत. ‘पुष्पा’च्या हिंदी डबसाठी श्रेयस तळपदेने आवाज दिल्यामुळे हिंदी चित्रपट आणखीच कमाल हिट गेला असे अनेकांचे म्हणणे आहे. आता चित्रपट पहालं तर तुमच्याही लक्षात येईलच.

‘पुष्पा’ चित्रपटातील गाणी, डायलॉग सध्या सोशल मीडियावर हवा करताना दिसत आहेत. ‘पुष्पा’ हा मूळ तामिळ-तेलगू सिनेमा आहे. पण तो इतर जितक्या भाषांमध्ये रिलीज झाला त्या प्रत्येक भाषेत तो हिट गेला आहे. हिंदीत सिनेमा डब करताना मेकर्स अनेकदा व्हॉईसओव्हर आर्टिस्टची मदत घेतात. पण ‘पुष्पा’च्या मेकर्सनी अल्लू अर्जुनच्या आवाजासाठी बॉलिवूड अभिनेता मराठमोळ्या श्रेयस तळपदेला निवडलं आणि मग काय? पुष्पा हिट झाला ना भाऊ. या सिनेमात अल्लू अर्जुनला श्रेयसने आवाज दिला असल्याचा त्याने लाईव्ह पुरावादेखील दिला आहे.