Take a fresh look at your lifestyle.

सोनू सूदच्या मनाचा असाही मोठेपणा ; ‘त्या’ चार मुलींना घेणार दत्तक

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेता सोनू सूद लॉक डाउन दरम्यान देशातील अनेक गरीब लोकांच्या मदतीला धावून आला होता. सोनू सूदने लॉक डाउन दरम्यान अनेक लोकांच्या घराचं आणि त्यांच्या जेवणाची सोय करून दिली होती. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था असो वा नोकरीची संधी असो ..सोनू सूद प्रत्येक वेळी गरिबांचा मासिहा म्हणून धावून आला. कोरोनाकाळात गरजू लोकांना मदत करणारा सोनू सूद  उत्तराखंडच्या चमोली दुर्घटनेत पिडीत कुटूंबाचा आधार बनला आहे. या दुर्घननेमुळे अस्वस्थ झालेल्या सोनूने  टिहरी जिल्ह्यातील  दोगी पट्टीच्या एका पिडीत कुटूंबातल्या चार मुलींना दत्तक घेतले आहे.

उत्तराखंडमध्ये नंदादेवी हिमकड्याचा काही भाग कोसळल्याने प्रलयामध्ये टिहरी जिल्ह्यातील आलम सिंग पुंडरी यांचा मृत्यु झाला होता. आलम यांच्या निधनाने त्यांचे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना चार मुली असून वडीलांची छत्रछाया नसल्याने त्या अनाथ झाल्या आहेत. आता या मुलींच्या भविष्याची जबाबदारी घेण्यासाठी सोनू सूद पुढे आला आहे. सोनू सूदच्या टीमने सांगितले की सोनू या चारही मुलींना दत्तक घेणार आहे.

सोनू त्यांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या लग्नापर्यंतची सगळी जबाबदारी घेणार आहे. आलम यांना लहान चार मुलं आहे. आंचल (14), अंतरा (11), काजल (08) आणि दोन वर्षांची अनन्या या मुलांच्या भविष्यासाठी त्यांचा आधार बनत सोनू सूद पुन्हा एकदा देवदूत बनत पुढे आला आहे. सोनूने उचलले हे पाऊल कौतुकास्पद आहे. चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.