Take a fresh look at your lifestyle.

ठरलं तर !! ‘या’ तारखेला वरुण धवन – नताशा अडकणार लग्नबंधनात 

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या रिलेशनशिपबाबत नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही. मागील बऱ्याच काळापासून ही जोडी रिलेशनशिपमध्ये आहे. आता त्यांच्या याच खास नात्यात लग्नाचं वळणही आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर वरूणचे काका आणि अभिनेता अनिल धवन यांनी वरूण आणि नताशा 24 जानेवारीला लग्न करणार असल्याची माहिती दिली.

अभिनेता अनिल धवन म्हणाले, गेल्या कित्येक दिवसांपासून मी वरूणच्या मागे लागलो होतो. लवकर नताशाला धवन कुटुंबांची सून म्हणून घेऊन ये. अखेर वरुण लग्नाला तयार झाला असून 24 जानेवारीला हे दोघे अलिबागला लग्नगाठ बांधणार आहे. मी आणि माझे कुटुंब वरूणसाठी खूश आहोत.

मागील बऱ्याच काळापासून नताशा आणि वरुण रिलेशनशिपमध्ये आहेत. मागील वर्षी म्हणजेच 2020 मध्येच ते विवाहबंधनात अडकले जाणार असल्याची चर्चा होती. पण, कोरोनाच्या संकटामुळं हे शक्य होऊ शकलं नाही. पण, आता मात्र खऱ्या अर्थानं ही जोडी नव्या प्रवासाची सुरुवात करण्यात सज्ज झाली आहे हे नक्की.

या दोघांच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. तसेच वरुणचे वडिल दिग्दर्शक डेविड धवन हे बॉलिवूडचे खूप जुने आणि प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक असल्यामुळे वरुणच्या लग्नाला अनेक कलाकारांची मंडळी असणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही. 5 दिवस हा शाही विवाह सोहळा रंगणार आहे. वरून धवन नंतर आलिया आणि रणबीर कपूर देखील लवकरच लग्ग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.