शुभमंगल सावधान!! वरुण-नताशाने बांधली लग्नगाठ
हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणाऱ्या वरून धवन आणि नताशा दलाल या कपलने अखेर लग्नगाठ बांधली. अलिबाग येथील द मेन्शन हाऊस येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती हा लग्नसोहळा पार पडला. काही वेळापूर्वीच वरुण-नताशाच्या संगीत सोहळ्याचे फोटो समोर आले होते.त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यानंतर आता या दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
वरुण आणि नताशाच्या लग्नानंतर त्यांचे अनेक फोटो समोर आले आहे. यात वरुणने गोल्डन रंगाची शेरवानी घातली होती. तर नताशाने त्याला मॅचिंग असा लेहंगा घातला होता. यावेळी ते दोघेही फार आनंदी दिसत होते.
या लग्न सोहळ्यात अगदी मोजक्या पाहुण्यांनाच आमंत्रण देण्यात आलं होतं. या लग्नसोहळ्यात केवळ ५० जणांनाच आमंत्रण देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच सुरक्षेची अत्यंत कडेकोट व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यात मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली होती.
दरम्यान, या लग्नसोहळ्यात कलाविश्वातील दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. यात करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, कतरिना कैफ, कियारा आडवाणी, अनिल कपूर, जान्हवी कपूर असे अनेक दिग्गज सहभागी झाले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’