Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता वरूण धवनच्या गाडीला अपघात

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या गाडीला अपघात झाला आहे. आज वरून धवनचे लग्न आहे. त्यासाठी वरुण त्याच्या लग्नासाठी जुहूवरुन अलिबागच्या दिशेने रवाना झाला होता. मात्र, याचवेळी वाटेत त्याच्या गाडीला अपघात झाला आहे. सुदैवाने वरुणला कोणतीही दुखापत झालेली नाही. परंतु, लग्नाला जाण्यापूर्वीच हा अपघात झाल्यामुळे सर्वत्र चिंतेच वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. याविषयी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

वरुण धवन आज ( २४ जानेवारी) त्याची प्रेयसी नताशा दलालसोबत लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाच्या तयारीसाठी वरुण आणि नताशाच्या घरातली मंडळी शुक्रवारीच अलिबागला पोहोचले होते. मात्र, काही कारणास्तव वरुणला जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे तो २३ तारखेला त्याच्या कारने अलिबागच्या दिशेने रवाना झाला होता. याचवेळी वाहतूक कोंडीत सापडलेल्या वरुणच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्याच्या गाडीचं किरकोळ नुकसान झालं आहे. मात्र, वरुणला कोणतीही दुखापत झालेली नाही.

वरुण आणि नताशाच्या लग्नासाठी सुरक्षेची सर्व व्यवस्था केली आहे जेणेकरून गोपनीयतेत कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप होऊ नये. लग्नस्थळाभोवती मोठ्या संख्येने सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर अनेक सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा लावण्यात आले आहेत. अभिनेत्याच्या कुटुंबातील कर्मचार्‍यांना मोबाइल फोन वापरू नका असे सांगितले गेले.

Leave A Reply

Your email address will not be published.