Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हॅपी बर्थ डे पप्पू!! वरूण धवनच्या वाढदिवशी जाणून घेऊ कशी आहे त्याची लाईफस्टाईल..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 24, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Varun Dhawan
0
SHARES
76
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा आणि आजचा बॉलिवूड सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता वरुण धवन अत्यंत त्याचा लूक, स्टाईल आणि अतरंगी अंदाजासाठी लोकप्रिय आहे. आज २४ एप्रिल असून वरुण धवन त्याचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे.

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

त्याने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूड सिनेविश्वात पदार्पण केलं. यानंतर त्याने विविध चित्रपटांमध्ये मुख्य नायकाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. आज वरूण धवनचे अनेक चाहते आहेत. ज्यांना त्याच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यात रस आहे. म्हणून आज लाडक्या अभिनेत्याच्या वाढदिवशी आपण त्याच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

दिनांक २४ एप्रिल १९८७ रोजी डेव्हिड धवन यांच्या पत्नी करुणा यांनी एका गोड मुलाला जन्म झाला. धवन जोडप्याला पुत्र प्राप्ती झाली अन घरात आनंद पसरला. डेव्हिड धवन लाडाने त्यांच्या लेकाला पप्पू असे म्हणू लागले आणि आजही त्याला घरात याच नावाने हाक मारली जाते. आपल्या मुलाने भविष्यात आपल्यासारखंच मनोरंजन सृष्टीत काहीतरी करावं अशी त्यांची इच्छा होती.

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

अन काळे केस, चॉकलेटी डोळे आणि ५.९ इतकी उंची असणारा हा अभिनेता बघता बघता सिनेविश्वातील आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत जाऊन बसला. वरुण दरवर्षी किमान एक तरी चित्रपट करतोच. एका चित्रपटासाठी तो साधारण ५ ते १० कोटी इतके मानधन आकारतो.

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

शिवाय जाहिराती, ब्रॅण्डिंग, शो, इव्हेंट्सच्या माध्यमातून तो इतर कमाई करतो. महिन्याला १० लाख कमाई झाली तर यानुसार वर्षागणिक त्याची होणारी प्रगती पाहता दरवर्षी त्याच्या उत्पन्नात ५ ते ६ टक्क्यांनी वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे वर्षभरात तो २० कोटींहून अधिक कमाई करत असल्याची शक्यता आहे. वयाच्या ३६ व्या वर्षी वरुण धवन तब्बल ४११ कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे.

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

वरुण धवन लॅविश लाईफ जगणे पसंत करतो. त्यामुळे वरुणच्या रोजच्या वापरातील वस्तूदेखील महागडे आणि ब्रँडेड असतात. कपडे, शूज, बेल्ट, गॉगल, ब्युटी प्रोडक्ट्स, परफ्युम आणि अजून बरंच काही… याशिवाय वरुण धवनला लक्झरी वाहनांचादेखील भारी शौक आहे.

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

त्यामुळे जर त्याच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, ८८ लाखांची मर्सिडीज बेंझ 350D, मर्सिडीज बेंझ E220D आणि ८५ लाखांची ऑडी Q7 या गाड्या वरुणच्या कलेक्शनचा भाग आहेत. याशिवाय त्याच्याकडे ३.७ लाख रुपये इतकी किंमत असलेली रॉयल एनफील्ड बुलेटदेखील आहे. याशिवाय पोलॅरिस स्पोर्ट्समॅन ८५० (क्वाड बाईक) देखील त्याच्या कलेक्शनमध्ये आहे. याशिवाय वरुणने मुंबईत जुहू येथे घेतलेले घर तब्बल ३० कोटी इतक्या किमतीचे आहे.

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

वरुण धवन जसा सिनेमात मस्ती करताना दिसतो खऱ्या आयुष्यातही त्याला धमाल मस्ती करताना जगणे आवडते. त्यामुळे मनात येईल ते करणे हा त्याचा स्वभावाचा केंद्रबिंदू आहे. याशिवाय खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप काटेकोर वागणे त्याला जमत नाही. आवडीबद्दल बोलायचं झालं तर चिकन, चीजकेक आणि बंगाली प्रसिद्ध मिठाई मिष्टी डोई वरुणचा जीव का प्राण आहे. प्रामुख्याने तो मांसाहार करणे पसंत करतो. याशिवाय पुस्तक वाचणे, नाचणे आणि पोहणे या त्याच्या आवडींपैकी अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा तेव्हा तो या कृती करून मनसोक्त आनंद लुटतो.

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

अभिनेता वरुण धवनचं नाव अभिनेत्री आलिया भट्ट, तापसी पन्नू आणि अगदी सारा अली खानसोबत देखील जोडलं गेलं होत. पण दिनांक २४ जानेवारी २०२१ साली त्याने फॅशन डिझायनर नताशा दलालसोबत लग्न केले. तो नताशाला शालेय जीवनापासून ओळखत असल्याचे नंतर समोर आले होते. सहावीत असल्यापासूनच त्याला नताशा आवडत होती. पण सहावी ते बारावी त्यांची घट्ट मैत्री राहिली आणि ऐन तारुण्यात वरुणला नताशावरील प्रेमाची जाणीव झाली.

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

करिना कपूर खानच्या एका रेडिओ शोमध्ये त्याने स्वतःच्या फिल्मी लव्ह स्टोरीबाबत सांगितले होते. यावेळी वरुणने नताशाला आपल्या भावनांविषयी सांगितले असता तिने त्याला नकार दिला होता. एका नव्हे तर चारवेळा वरुणने हा नकार पचवला आहे. खूप कष्ट घेतले पण शेवटी त्याने नताशाकडून होकार मिळवला आणि आज बॉलिवूडच्या ट्रेंडिंग कपलमध्ये त्यांचं नाव घेतलं जात.

Tags: Birthday Celebrationbollywood actorInstagram Postvarun dhawanviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group