Take a fresh look at your lifestyle.

पहा अभिनेत्री ऐश्वर्या रॉयचा जबरदस्त डान्स ; व्हिडिओ वायरल

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | आजकाल सोशल मीडियावर जुन्या व्हिडीओंचा ट्रेंड पाहायला मिळतो. अनेक कलाकार स्वतःचे जुने व्हिडीओ सोशल मीडिया वर शेअर करत असतात. अशातच बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या भन्नाट डान्स करताना दिसत आहे.

ऐश्वर्या राय या फॅनपेजने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ऐश्वर्या डान्स करताना दिसत आहे. तिचा हा जुना व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ 90 हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून अनेकांनी लाईक केला आहे. सध्या ऐश्वर्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

This masterpiece performance in this part🎶💜😍😍😍😍 . . . . احب المقطع مررره😍😍😍 مزيج بين الرقص الهندي و الموسيقى اللاتينية 💜 ابداااع من السيدة راي باتشان كالعادة 🔥💜😍 . . . . #20yearsOfHamaraDilAapkePaasHai . #aishwarya #aishwaryarai #aishwaryaraibachchan #WeLoveAishwarya #shakira #Beyoncé #katyperry #Rihanna #camilaCabello #maluma #zaynmalik #LegendOfBollywood #MostBeautifulWomen #missworld #beauty #Bollywood #Hollywood #Algeria #SaudiArabia #PonniyinSelvan #ايشواريا #اشواريا #اشواريا_راي #اشواريا_راي #أيشواريا_راي #آيشواريا_راي #ديبيكا_بادكون #ايشواريا_راي_باتشان

A post shared by Aishwarya Rai Bachchan (@aishwaryarai._) on

काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती.आता संपूर्ण बच्चन कुटुंबीयांनी करोनावर मात केली आहे.लवकरच ऐश्वर्या मणिरत्नम यांच्या चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच ती अनुराग कश्यपच्या ‘गुलाब जामुन’ या चित्रपटातही भूमिका साकारु शकते अशा चर्चा रंगल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’